गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:46 AM2019-09-10T00:46:59+5:302019-09-10T00:47:37+5:30

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे.

 All four dams in Gangapur group hold 5% | गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

Next

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
गोदावरी नदीवर असलेल्या गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी या तीनही धरणांचा साठा १०० टक्केअसून, आळंदीदेखील १०० टक्के भरले आहे. समूहातील या चारही धरणांमध्ये सध्या १०,३२० दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागीलवर्षी हा साठा १०,१४२ इतकाच दलघफू होता. दरम्यान, जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा साठा ८० टक्के इतकाच होता.
दरम्यान, हवामान खात्याने आगामी ४८ तासात उत्तरमध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.
नांदूरमधमेश्वरमधून विसर्ग
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदूरमधमेश्वर धरण जिल्ह्यात सर्वांत प्रथम १०० टक्के भरल्याने त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. या हंगामात नांदूरमधमेश्वरमधील हे विक्रमी विसर्ग ठरला. आता पावसाला पुन्हा सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाल्यामुळे विसर्ग सुरू झाला आहे. त्यातही नांदूरमधमेश्वरमधून सर्वाधिक ७,६२४ क्यूसेक इतका विसर्ग केला जाता आहे.
१४ धरणांचा साठा १०० टक्के
वरुणराजाची भरभरून कृपादृष्टी झाल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली आहेत. जवळपास सर्वच धरणांचा साठा हा ९० टक्केच्या पुढे असून, २४ पैकी १४ धरणांमधील पाणीसाठा, तर १०० टक्के इतका आहे. गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, तीसगाव, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, हरणबारी, केळझर या धरणांचा पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सद्यस्थितीत १५ प्रकल्पांमधून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
जिल्ह्यात मोठे मध्यम असे एकूण २४ प्रकल्प आहेत. त्यामध्ये सात मोठे प्रकल्प असून, १७ मध्यंम प्रकल्पाची संख्या आहे. यासर्व प्रकल्पांची क्षमता ६५८१४ संकल्पित पाणीसाठा असून, मोठ्या प्रकल्पांमध्ये ४८००४ इतकी साठवण क्षमता आहे.

Web Title:  All four dams in Gangapur group hold 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.