कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

By श्याम बागुल | Published: February 1, 2020 08:32 PM2020-02-01T20:32:01+5:302020-02-01T20:34:38+5:30

नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे

Ajit Pawar in the quality list despite getting low marks | कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

Next
ठळक मुद्देअजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडेअजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले

श्याम बागुल
परीक्षेत कमी मार्क मिळवूनही निव्वळ व्यवहारी ज्ञान नसल्यामुळे गुणवत्ता यादीत आलेल्यांनाही मागे रहावे लागते, असा स्वानुभव कथन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांची करमणूक करून भाजपला व पर्यायाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असला तरी, पाठीशी बोटावर मोजण्याइतपत आमदारांचे पाठबळ असतानाही चक्क भाजपच्या मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्रिपदाची भल्या पहाटे शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना त्यावेळी कोणते व्यावहारिक ज्ञान होते हे सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असतानाही स्पष्ट होऊ शकलेले नाही. एक मात्र खरे भाजपशी सत्तास्थापन करण्यासाठी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात स्वपक्षातून पहिल्यांदाच निषेधाचे मोठ्या प्रमाणात सूर निघू लागल्यानंतर पवार यांना आपल्यातील व्यावहारिक ज्ञानाची तत्काळ प्रचिती आली असावी व त्यातूनच त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला असावा, असा अर्थ त्यातून काढण्यास हरकत नसावी.


उत्तर महाराष्टच्या विकासाच्या दृष्टीने आगामी वर्षाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार हे दोन दिवस नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टÑवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती स्थानिक राजकारण्यांचे कोंडाळे जमलेले असताना राज्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसतानाही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे व ५४ आमदार असलेल्या राष्टवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणे यावर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे परीक्षेत कमी मार्क मिळविणारा व्यवहारात हुशार असतो त्यामुळे तो पुढे जातो. जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त, पण व्यवहारात कमी असतो. व्यावहारिक ज्ञानामुळे आम्ही सत्तेत असल्याचे विधान करून अजित पवार यांनी भाजपला अज्ञानी ठरविले. मात्र भाजपला जास्त मार्क मिळालेले माहिती असतानाही अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. परंतु ज्या सहकाऱ्यांच्या बळावर पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी अवघ्या तीन तासात घूमजाव करून पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वत:ला कमी मार्क मिळूनही व्यावहारिक ज्ञान अधिक असल्याचा दावा करणा-या अजित पवार यांना अवघ्या ८२ तासांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळी त्यांच्या व्यावहारिक ज्ञानाची प्रचिती अवघ्या देशाला आली. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कालावधी जवळ आलेला असतानाही अद्यापही अजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडे उलगडलेले नाही. नाशिक मुक्कामी बोलताना मात्र अजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले ते पाहता, जास्त गुण मिळविणा-या भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नुसताच डोक्याने विचार केला. तर पवार यांनी त्यांच्या सोबत जाताना व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्यात त्यात ‘भाजप नको’ या एकमेव विचाराने शिवसेना, राष्टवादी व कॉँग्रेसला तातडीने एकत्र यावे लागले व त्यातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, असा त्यातून अर्थ निघत असेल तर अजित पवार यांना असलेले व्यावहारिक अगाध ज्ञान काका शरद पवार यांनाही ज्ञात नसावे असे मानावे काय? एकमात्र खरे पाठीशी आठ ते दहा आमदारांचे (म्हणजेच कमी गुण) असतानाही थेट भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेणा-या अजित पवार यांच्यावर बंडखोरी केल्याबद्दल कारवाई होण्याऐवजी महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद बहाल करून त्यांच्यातील कमी गुणांचे केलेले कौतुक एकमेव राष्टवादी कॉँग्रेस पक्षातच होऊ शकते हे निश्चित !

Web Title: Ajit Pawar in the quality list despite getting low marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.