दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 01:40 PM2020-07-07T13:40:21+5:302020-07-07T13:40:45+5:30

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते त्वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे.

Agriculture Revitalization Week in Dindori | दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह

दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह

googlenewsNext

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते  वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे.
वणी कृषी मंडळातील देवळीचा पाडा येथे या कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी दिन साजरा करण्याचा अभिनव उपक्र म राबविण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी डॉ .कैलास खैरनार , अभिजित जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्र म राबविला जात आहे. मंडळ कृषी अधिकारी एस .वाय .सावंत ,कृषी सहाय्यक एस .एस .ठोकळे हे कृषी संजीवनी सप्ताह यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत . पळसविहीर ,धोंडाळपाडा , कुहिआंबी ,ननाशी , चिकाडी आदी ठिकाणीही कार्यक्र म घेण्यात आला .
-----------------------
मरळगोई येथे कृषीसप्ताहाला प्रारंभ
लासलगांव : हरितक्र ांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मरळगोई येथे १२०० केशर आंब्याची लागवड नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक जन्मदिनाच्या निमित्ताने एक जुलै रोजी मरळगोइ बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत बाराशे केशर आंब्याची लागवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी , गट विकास अधिकारी संदीप कराड ,निफाड पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, उपसरपंच निवृत्ती जगताप उपस्थित होते.

Web Title: Agriculture Revitalization Week in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक