कांदा उत्पादकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:31 PM2020-02-21T23:31:15+5:302020-02-22T01:21:45+5:30

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ ...

Affordability of onion growers | कांदा उत्पादकांची परवड

कांदा उत्पादकांची परवड

Next
ठळक मुद्देउत्पादनात घट : केंद सरकारच्या निर्यात धोरणावर भवितव्य अवलंबून

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पन्न घटल्याने थोडा अधिक दर मिळूनदेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड होण्याची शक्यता बोलली जात आहे. शासनाच्या पूरक निर्यात धोरणावर शेतकरी अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लावलेली सुमारे ८० टक्के रोपे सडली. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा रोपे टाकली. पहिल्या नोव्हेंबरच्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याची रोपे गेल्याने शेतकºयांचा पैसा वाया गेला. सुरु वातीला अतिरिक्त पावसाचा फटका झेलून ज्या २० टक्के शेतकºयांची रोपे वाचली, त्या शेतकºयांचा कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. त्यांना साधारण दोन हजार ते २४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ज्या शेतकºयांची रोपे सडली, त्यांनी पुन्हा रोपे तयार करण्यात दीड महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उशिरा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातच कायम ढगाळ वातावरण आणि त्यामुळे झालेला औषधांचा झालेला वाढीव खर्च याशिवाय उशिरा लागवडीमुळे कांदा पोसला नाही. वजनातदेखील कमी भरणार आहे. उशिरा कांदा लागवडीची प्रतवारी साठवणी योग्य चांगली राहील का? हा प्रश्न आहे.
तापमानात सध्या चांगलीच वाढ होत आहे. ३२ अंशांच्या पुढे तापमान चालले आहे. त्या कांद्याच्या साठवण क्षमतेवर परिणाम करणारे तापमान शेतकºयांना सतावू लागले आहे. उत्पादनदेखील ५० ते ६५ टक्के निघण्याची शक्यता आहे. तरीही दरवर्षीपेक्षा तुलनेत कांदा उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने यंदा कांदा उत्पादक शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची आशा आहे. यंदा पुन्हा कांद्याने शेतकरी हसणार असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा उन्हाळ कांद्याला १८०० ते २००० प्रतिक्विंटल दर जरी मिळाला तरी साठवण करण्याकडे शेतकºयाचा कल कमी राहण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेला कांदा एप्रिल अखेर बाजारात येईल.
दरम्यान निर्यात शेतकºयांना मारक ठरणार नाही याची शासनाला काळजी घ्यावी लागेल. देशांतर्गत कांदा मागणी साधारण असताना कांदा निर्यात धोरण प्रोत्साहन देणारे असावे, त्यामुळे शेतकºयाच्या हाती दोन पैसे येतील आणि सुखाचे दोन घास खाता येतील.

उन्हाळ कांद्याला हवा दर
गुरु वारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य बाजार आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २०५१, सरासरी १८७० रुपये असल्याचे चित्र दिसले. कांद्याचे असेच दर टिकून राहिले तर उन्हाळ कांद्याला किमान २५०० ते २८०० रु पये दर मिळाला तरी शेतकरी समाधानी असेल आणि कांदा साठवणीच्या भानगडीत फारसा पडणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

कांदा निर्यात धोरणात आता शासनाने शेतकरी हित पाहून निर्यात खुली करावी. त्यामुळे शेतकºयांच्या कांद्याला दर मिळेल. शेतकºयांना मारक धोरण केंद्र शासनाने राबवू नये.
- उत्तम पुंड
कांदा उत्पादक, पारेगाव

Web Title: Affordability of onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.