जलद न्यायप्रक्रियेत वकिलांचेही सहकार्य आवश्यक : अभय वाघवसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:11 AM2020-01-04T00:11:46+5:302020-01-04T00:48:19+5:30

जलद न्यायप्रक्रियेत वकिलांची भूमिका महत्त्वाची असून, न्यायालयीन कामकाजात वकिलांनी तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनने सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केले.

Advocate cooperation also required in the speedy justice process: Abhay Vaghavas | जलद न्यायप्रक्रियेत वकिलांचेही सहकार्य आवश्यक : अभय वाघवसे

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय वाघवसे यांचा सत्कार करताना नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे. समवेत अ‍ॅड. महेश लोहिते, अ‍ॅड. संजय गिते. अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. अविनाश भिडे. अ‍ॅड. अजय मिस्सर, अ‍ॅड. हर्षल केंगे.

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक बारतर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा सत्कार सोहळा

नाशिक : जलद न्यायप्रक्रियेत वकिलांची भूमिका महत्त्वाची असून, न्यायालयीन कामकाजात वकिलांनी तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनने सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केले.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारातील अ‍ॅडव्होकेट चेंबर बिल्ंिडग दोनमध्ये शुक्रवारी (दि.३) जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी नव्याने नियुक्त झालेले न्यायाधीश अभय वाघवसे यांचा नाशिक बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. जालिंदर ताडगे, वकील सोसायटीचे चेअरमन अनिल विघ्ने आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार अ‍ॅड. संजय गिते यांनी केले. अ‍ॅड. हर्षल कें गे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख, एस. डी. त्रीपाठी, व्ही. एस. कुलकर्णी, सरकारी वकील अजय मिस्सर, अ‍ॅड. महेश लोहिते, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड आदींसह पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचीही हीच भूमिका
न्यायाधीश अभय वाघवसे यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी तसेच नूतन इमारतीसाठी न्यायव्यवस्थेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. तत्पूर्वी बार असोसिएशनची भूमिका मांडताना महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अ‍ॅड.जयंत जायभावे यांनी नाशिक बार असोसिएशन नेहमीच जलद न्यायप्रक्रियेसाठी आग्रही राहिल्याचे सांगतांना महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचीही हीच भूमिका असल्याचे नमूद केले.

Web Title: Advocate cooperation also required in the speedy justice process: Abhay Vaghavas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :advocateवकिल