नाशिकच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा वाढीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:42 PM2021-02-10T12:42:21+5:302021-02-10T12:44:22+5:30

नाशिक- जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आढावा बैठकीत राज्य सरकारने नाशिकसाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी मंजुर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

Additional fund of Rs. 150 crore from the state government for the development of Nashik | नाशिकच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा वाढीव निधी

नाशिकच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा वाढीव निधी

Next
ठळक मुद्देउपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठकजिल्ह्याच्या वर्धापनदिनासाठीही निधी

नाशिक- जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आढावा बैठकीत राज्य सरकारनेनाशिकसाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी मंजुर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांची बैठक आज नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने वाढीव दीडशे कोटी रूपयांचा निधी दिल्याने आता नाशिक जिल्ह्याचा एकुण आराखडा ९५० कोटी रूपयांचा आराखडा झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेचा हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यामुळे त्यासाठी खास २५ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हॉलसाठी पाच कोटी रूपये देखील मंजुर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकला न्याय दिला अशी प्रतिक्रीया या बैठकीनंतर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाशिक विभागीय स्तरावरील या बैठकींना कृषी मंत्री दादा भुसे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वित्त राज्यमंत्री शंभु राजे देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

Web Title: Additional fund of Rs. 150 crore from the state government for the development of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.