चांदवड महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:10 PM2020-01-18T22:10:51+5:302020-01-19T01:13:35+5:30

नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

Addiction lessons along with road safety at Chandwad College | चांदवड महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे

चांदवड येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या प्रांगणात रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात टाळण्यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन करण्यात आले.

Next

चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.
टोल प्लाझा , वाहतूक पोलीस विभाग (नाशिक, पिंपळगाव ब.) राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वाहतूक विभाग उपअधीक्षक नजीर शेख , सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, आयएसपीटीएल टोल प्लाझाचे के. व्ही. सुरेश , टोल व्यवस्थापक पंकज झंवर, प्रशांत ठाकरे यांनी वाहतुकीचे नियम व चालकानेवाहन चालवताना सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून वाहन चालविल्यास होणारे अनर्थ टाळण्यास मदत होईल, या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन
चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या प्रांगणात रस्ता सुरक्षा वाहतूक नियम व अपघातग्रस्तांना मदत जनजागृत्ती अभियानासाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपळगाव केंद्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, गटविकास अधिकारी महेश पाटील, सोमा कंपनीचे व्यवस्थापक पंकज झंवर, इरकॉन सोमाचे सुरेशकुमार, मुख्याध्यापक जयश्री गोळेचा, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य धनंजय मोरे ्रआदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Addiction lessons along with road safety at Chandwad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.