महिला सुरक्षिततेसाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:04 AM2020-02-10T00:04:42+5:302020-02-10T00:55:11+5:30

हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Act for Women's Safety | महिला सुरक्षिततेसाठी कायदा करा

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देताना छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, उमेश शिंदे, नितीन सातपुते, किरण डोखे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देमागणी : छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्यातील अनेक तरुणी, महिला शिक्षणासाठी, नोकरीसाठी दूरवर प्रवास करत असतात अशा घटनांमुळे महाविद्यालयातील तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, उमेश शिंदे, नितीन सातपुते, किरण डोखे, विजय खर्जुल, सुनील भोर, ज्ञानेश्वर थोरात, विकास काळे, मनोरम पाटील, शिवम देशमुख, प्रथमेश पिंगळे, रवी भांभिरगे आदी उपस्थित होते.

Web Title: Act for Women's Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला