टेम्पो-रिक्षाचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:19 AM2019-09-16T00:19:16+5:302019-09-16T00:19:39+5:30

सिन्नर येथील नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जबर धडक दिली. यात रिक्षाने अचानक पेट घेतला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला भाजून ठार झाली, तर रिक्षासह दुचाकीवरील सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

Accidental tempo rickshaw | टेम्पो-रिक्षाचा भीषण अपघात

सिन्नर येथील आडवा फाटा परिसरात आयशर-रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातानंतर रिक्षाने पेट घेतला. आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान.

Next
ठळक मुद्देरिक्षाने घेतला पेट; महिला ठार, चार जखमी

सिन्नर : येथील नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जबर धडक दिली. यात रिक्षाने अचानक पेट घेतला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला भाजून ठार झाली, तर रिक्षासह दुचाकीवरील सात ते आठ जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
सरोजाबाई सुखलाल परदेशी (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. येथील उद्योगभवन परिसरातील मेंगाळ मळ्यातील भीमाबाई द्वारकानाथ मेंगाळ (६०), सुनील द्वारकानाथ मेंगाळ (२७) यांच्यासह अक्षय पाल (२५) व अर्जुन साहू हे परप्रांतीय कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले आहेत.
नाशिकहून सिन्नरच्या दिशेने येणाºया आयशर टेम्पोने (क्र. एमएच १४ एचजी १३९९) दुचाकीसह रिक्षाला (क्र. एमएच १५ एफ. यू. ३९५०) जोरदार धडक दिली. वेगामुळे टेम्पो नियंत्रित न झाल्याने रिक्षाला १०० ते १५० फूट फरफटत नेले. यात रिक्षाचा मागील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. अपघातात रिक्षाची पेट्रोल टाकी फुटल्याने रिक्षाने पेट घेतला. त्यामुळे आगीचा भडका उडल्याने प्रवाशांपैकी सरोजबाई भाजल्या गेल्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील हे तपास करीत आहेत.
आग विझविण्याचा प्रयत्न
अपघातानंतर टेम्पोचालक वाहन सोडून पसार झाला. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र रसेडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंब येईपर्यंत मे. शंकरराव बाळाजी वाजे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन प्रतिबंधक सिलिंडरद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीचे अग्निशमन बंबही दाखल झाल्याने रिक्षाची आग आटोक्यात आली. स्थानिकांनी रिक्षा तोडून प्रवाशांना बाहेर काढले.

Web Title: Accidental tempo rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.