परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:58 PM2021-10-19T22:58:46+5:302021-10-19T22:59:10+5:30

लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Accident near Parmori; Father's death, son serious | परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर

Next
ठळक मुद्दे मुलगा गोरख मोतीराम गवळी हा गंभीर जखमी झाला.

लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मंगळवारी (दि.१९) दुपारी २ वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते वरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर परमोरी गावाजवळील मारुती मंदिरासमोर रोडवर ट्रक (क्र. एमएच ४३ यू ७२०७) आणि मोटारसायकल (क्र. एमए १५ एचडी ३८९३) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात मोटारसायकलवरील मोतीराम गंगाधर गवळी (६०) हे जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा गोरख मोतीराम गवळी हा गंभीर जखमी झाला.

ते दोघे चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील रहिवासी आहेत. ऐन कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी अपघात झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Web Title: Accident near Parmori; Father's death, son serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.