माळवाडीत वाळूच्या ट्रकचे टायर फुटल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:31 PM2020-03-18T22:31:19+5:302020-03-18T22:33:09+5:30

देवळा : विंचूर - प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्याजवळील पुलावर वाळूने भरलेल्या ट्रकला टायर फुटल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Accident due to tire bursting of sand truck in Malwadi | माळवाडीत वाळूच्या ट्रकचे टायर फुटल्याने अपघात

माळवाडीत वाळूच्या ट्रकचे टायर फुटल्याने अपघात

Next
ठळक मुद्देअपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ बंद झाल्यामुळे शेजारील नवीन पुलावरून वाहतूक वळविली होती.

देवळा : विंचूर - प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्याजवळील पुलावर वाळूने भरलेल्या ट्रकला टायर फुटल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंधरा दिवसांपूर्वीच या पुलाजवळ वाळूने भरलेला टेम्पो रात्रीच्या वेळी शेतात उलटल्याची घटना घडली होती. पुन्हा तशीच घटना घडल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. सोमवारी (दि. १६) रात्री बारा वाजेदरम्यान देवळा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. सटाण्याहून वाळूने भरलेला ट्रक (क्र. एमएच ४४ ९८३६) देवळ्याकडे येत असताना माळवाडी फाट्याजवळील ब्रिटिशकालीन पुलावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक कठड्याला धडकला. त्यात वाहनाचे नुकसान झाले. अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ बंद झाल्यामुळे शेजारील नवीन पुलावरून वाहतूक वळविली होती
माळवाडीत वाळूच्या ट्रकचे टायर फुटल्याने अपघातदेवळा : विंचूर - प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्याजवळील पुलावर वाळूने भरलेल्या ट्रकला टायर फुटल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंधरा दिवसांपूर्वीच या पुलाजवळ वाळूने भरलेला टेम्पो रात्रीच्या वेळी शेतात उलटल्याची घटना घडली होती. पुन्हा तशीच घटना घडल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. सोमवारी (दि. १६) रात्री बारा वाजेदरम्यान देवळा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. सटाण्याहून वाळूने भरलेला ट्रक (क्र. एमएच ४४ ९८३६) देवळ्याकडे येत असताना माळवाडी फाट्याजवळील ब्रिटिशकालीन पुलावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक कठड्याला धडकला. त्यात वाहनाचे नुकसान झाले. अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ बंद झाल्यामुळे शेजारील नवीन पुलावरून वाहतूक वळविली होती.

Web Title: Accident due to tire bursting of sand truck in Malwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.