बाहेर गावाहून येणाऱ्यांना प्रवेशबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:40 PM2020-03-25T23:40:48+5:302020-03-25T23:41:17+5:30

बागलाण तालुक्यात चार दिवसांत पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, नाशिक, नगर येथून गावाकडे मोठ्या प्रमाणात लोंढे आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता गावागावातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणाºया व्यक्तींना प्रवेशाला बंदी असल्याचे फलक झळकू लागले आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्यांची पंचायत झाली आहे.

Access to those coming from outside the village! | बाहेर गावाहून येणाऱ्यांना प्रवेशबंदी!

बागलाण तालुक्यातील चौंधाणे ग्रामपंचायतीने बाहेर गावाहून येणाऱ्यांसाठी असे फलक लावून प्रवेशास मज्जाव केला आहे.

Next
ठळक मुद्देप्रवेशद्वारावर झळकताहेत फलक : स्थलांतरित कुटुंबीयांची पंचाईत

सटाणा : बागलाण तालुक्यात चार दिवसांत पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, नाशिक, नगर येथून गावाकडे मोठ्या प्रमाणात लोंढे आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता गावागावातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणाºया व्यक्तींना प्रवेशाला बंदी असल्याचे फलक झळकू लागले आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेल्यांची पंचायत झाली आहे.
बागलाण तालुक्यातील पन्नास हजाराहून अधिक नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मात्रकोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातल्याने अनेकांनी आपल्या मूळ गावाची वात धरली आहे. लोंढेच्या लोंढे येत असल्याने ग्रामीण भागात येत आसल्याने धास्तावलेल्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच बाहेरगावहून येणार्यांनी गावात न येण्याचे आवाहन करणारे फलक झळकविले आहेत. केरसाणे येथे पुणे येथील तसेच उस तोडणीला गेलेल्या मजुरांना सर्दी-खोकला झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान एकाने सटाण्यातील एका नामांकित डॉक्टरकडे उपचार घेतल्याने अफवांमध्ये अधिकच भर पडली असून आरोग्य विभागच्या पथकाने आपल्या निगराणीखाली या संशियत रु ग्णांना ठेवावे अशी मागणी सरपंच संजय अहिरे यांनी केली आहे. गावात कोरोनाबाबत अफवांचे पेव फुटल्याचे चित्र असून गावागातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणार्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशबंदी करून काळजी घेताना दिसत असले तरी गावाकडे परतणार्या भावांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची पंचाईत होत आहे.
बागलाणमध्ये परदेशातून आलेल्या नऊ जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आलेले आहे. त्यापैकी एकाचे मेडिकल रिपोर्ट आले असून, कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, संचारबंदीत काम करणाºया पोलीस कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, ग्रामसेवक, शासकीय कर्मचार्यांना मास्क आदी उपलब्ध नसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Access to those coming from outside the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.