९५ वे साहित्य संमेलन उदगीरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 01:43 AM2021-12-06T01:43:57+5:302021-12-06T01:46:11+5:30

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्यात येणार असल्याची असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. पुढील चार महिन्यांच्या आत हे संमेलन घेण्यात येणार असल्याचे ९४ व्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ठाले-पाटील यांनी सांगितले. या संमेलनाच्या माध्यमातून नाशिकरांसोबत नाते जोडले गेले आहे. पुढील चार-पाच वर्षांनी आमंत्रण द्या, पुन्हा नाशिकला येऊ, असेदेखील ठाले-पाटील यांनी या वेळी सांगितले.

95th Sahitya Sammelan Udgirla | ९५ वे साहित्य संमेलन उदगीरला

९५ वे साहित्य संमेलन उदगीरला

googlenewsNext
ठळक मुद्देसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांची घोषणा

नाशिक : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्यात येणार असल्याची असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. पुढील चार महिन्यांच्या आत हे संमेलन घेण्यात येणार असल्याचे ९४ व्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ठाले-पाटील यांनी सांगितले. या संमेलनाच्या माध्यमातून नाशिकरांसोबत नाते जोडले गेले आहे. पुढील चार-पाच वर्षांनी आमंत्रण द्या, पुन्हा नाशिकला येऊ, असेदेखील ठाले-पाटील यांनी या वेळी सांगितले.

कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या ९४ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजले. या वेळी समारोप सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ठाले-पाटील म्हणाले, नाशिकच्या संमेलनाला अबालवृद्धांचे हातभार लागले. अध्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी संमेलन सुरळीत पार पडल्याचा टोळा देखील त्यांनी लगावला. संमेलनात करण्यात आलेल्या ठरावांचा साहित्य महामंडळ नक्कीच पाठपुरावा करेल. ठराव बासनात बांधून ठेवले जाणार नाहीत. हे ठराव संबधित विभागाला पाठवून त्यांचा नियमित पाठपुरावा केला जाईल. मात्र, मराठी संबधित मुद्दा आला की बऱ्याचदा अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे, यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज असते. व्यासपीठावर उपस्थित मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावी. त्यांनी लक्ष न दिल्यास विधान परिषदेच्या उपाध्यक्षांनी सरकारला आदेश द्यावा असेल देखील ठाले-पाटील यांनी सांगितले. ठराव ही भावना साहित्यिकांची, लोकांची आहे, त्यामुळे ठरावातील मराठी भाषिकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवावे, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्याच्या प्रश्नांवर पोटतिडकीने विचार करण्याची मागणी केली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संमेलनात स्वत:हून सहभाग घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे देखील ठाले-पाटील म्हणाले. निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले.

----------

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर ठाले-पाटील म्हणाले, समाजातील सर्वजण सहिष्णू असतात असे नाही. त्यामुळे अशा काही घटनांकडे दुर्लक्ष करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे व्यवहारकोश तयार केला, तोच उपक्रम यशवंतराव चव्हाण यांनीही राबवला. त्याचा आता किती उपयोग होतो हे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही ठाले पाटील यांनी सांगितले.

Web Title: 95th Sahitya Sammelan Udgirla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.