९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:58 PM2020-07-02T23:58:15+5:302020-07-02T23:59:05+5:30

व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा परत न केल्याने आर्टिलरी सेंटररोड विजयालक्ष्मी चेंबर बेसमेंट नोटरी करार निश्चित करून बेसमेंटची खरेदी न देता तसेच ९३ लाख ५० हजार रुपये पुन्हा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

93 lakh fraud case filed | ९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Next

नाशिकरोड : व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा परत न केल्याने आर्टिलरी सेंटररोड विजयालक्ष्मी चेंबर बेसमेंट नोटरी करार निश्चित करून बेसमेंटची खरेदी न देता तसेच ९३ लाख ५० हजार रुपये पुन्हा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड गुरुद्वारामागील बलविंदरसिंग परमजितसिंग लांबा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ सुखविंदरसिंग, जसप्रितसिंग, गुरु प्रितसिंग, तसेच तुषार राजेंद्रकुमार अरोरा, विशाल अरोरा हे एकत्रित गुंतवणूक करत असतात. २०१६ साली बलविंदरसिंग यांचे परिचित इलेक्ट्रिक कान्ट्रॅक्टर अभिषेक विनोद त्रिवेदी व कीर्ती अभिषेक त्रिवेदी रा. घंटी म्हसोबा मंदिरमागे, नाशिकरोड तसेच वसंत ओंकार पाटील (रा. वास्को हॉटेलमागे) यांना बलविंदरसिंग व त्यांच्या भागीदारांनी व्यवसायासाठी मोठी रक्कम दिली होती.

Web Title: 93 lakh fraud case filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.