येवल्यात 9 बाधित; 4 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:47 PM2020-09-13T22:47:08+5:302020-09-14T00:32:44+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील 9 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

9 affected in Yeola; 4 coronal free | येवल्यात 9 बाधित; 4 कोरोनामुक्त

येवल्यात 9 बाधित; 4 कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देबाधितांच्या संपर्कातील 75 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठवले

येवला : शहरासह तालुक्यातील 9 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यातील अंदरसुल व सायगाव येथील दोघा संशयितांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल रविवारी, (दि. 13) पॉझिटिव्ह आले असून शनिवारी, (दि. 12) उशीरा अंदरसुल येथील 5 तर शहरातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक रूग्णालयातून 3 तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून एक असे एकूण 4 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील 75 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठवले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

 

Web Title: 9 affected in Yeola; 4 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.