निवडणुकीसाठी ३० हजार मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:45 AM2019-09-24T01:45:18+5:302019-09-24T01:45:35+5:30

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.

 6,000 manpower for election | निवडणुकीसाठी ३० हजार मनुष्यबळ

निवडणुकीसाठी ३० हजार मनुष्यबळ

Next

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४४४६ व अंदाजे १३९ सहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाºयांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रातील कामकाज, ईव्हीएम मशीन, मतमोजणी याबाबतची तांत्रिक माहिती कर्मचाºयांना देण्यात आलेली आहे. कर्मचाºयांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील अनुभव जसे व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर, सोशल मीडिया, सी-व्हीजील, बेवकास्टिंग, जीपीएस प्रणालीचा वापर याबरोबरच टेस्ट वोट, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विधानसभा मतदारसंघानिहाय प्रत्येकी एक याप्रमाणे १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
निवडणुकीसाठी प्रत्यक्ष लागणाºया एकूण कर्मचाºयांपैकी जादा कर्मचाºयांना सामावून घेतले जाते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निर्माण होणाºया परिस्थितीत कर्मचाºयांची संख्या कमी होणार नाही याची पूर्वतयारी म्हणून अतिरिक्त कर्मचाºयांचे नियोजन केले जाते. जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५६ हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे दीड लाख नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आल्यामुळे मतदार यादीतील जवळपास ५० हजार नावांची घट झाल्याचे समोर आले. दरम्यान, अद्याप अडचणीच्या मतदान केंद्रांची निश्चित आकडेवारी करण्यात आलेली नाही. संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ६० मतदान केंद्रे संवेदनशील होती. यामध्ये सर्वाधिक ३३ केंद्रे मध्य विधानसभा मतदारसंघात होती.
१५ सखी मतदान केंद्रे
प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर केवळ महिलांचीच नियुक्ती केली जाते. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाचा वापर अनेक केंद्रांवर महिला कर्मचारी करण्याची शक्यता आहे.
४गेल्या लोकसभा निवडणुकीत सखी केंद्रांवरील काही महिला कर्मचाºयांनी गुलाबी साड्या परिधान केल्या होत्या, तर गुलाबी फुग्यांनीदेखील केंद्राचे प्रवेशद्वार सजविण्यात आले होते. यंदाही अशाप्रकारचे केंद्र प्रकर्षाने अभिनव संकल्पना राबविण्याची शक्यता आहे.

Web Title:  6,000 manpower for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.