नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:28 PM2021-05-29T17:28:58+5:302021-05-30T00:02:28+5:30

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी १४०० रुपये भाव मिळाला.

5500 quintals of onion arrives in Nandurshingote sub-market | नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक

नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक

googlenewsNext
ठळक मुद्दे100 जणांची कोरोना चाचणी ; दोन बाधित

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी १४०० रुपये भाव मिळाला.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून सिन्नर बाजार समितीच्या वतीने नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करण्यात आला. बाजारात प्रवेश करण्यापूर्वीच शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी, मदतनीस आणि बाजार समितीशी संबंधित १०० व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी ९८ जण निगेटिव्ह, तर दोनजण कोरोनाबाधित आढळून आले. उपचारासाठी त्यांची रवानगी दोडी बुद्रूक येथील कोविड सेंटरमध्ये करण्यात आल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी दिली.
शुक्रवारी नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटलची आवक झाली. बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याचे बघूनच प्रवेश देण्यात आला. ज्यांनी टेस्ट केलेली नाही त्यांची प्रवेशद्वारावरच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संचालक अनिल सांगळे, विजय सानप, व्यापारी भारत मुंगसे, रवींद्र शेळके, विशाल बर्के, बाजार समितीचे उपसचिव अनिल परदेशी, राजेभोसले आदी उपस्थित होते.


नियमावलीचे पालन
यापुढेही कोरोनाची नियमावली पाळणे बंधनकारक राहणार आहे. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त शेतकरीच कांदा, शेतीमालाजवळ थांबेल. बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे आवश्यक राहील. शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रूक उपबाजार आवारात दुपारी ३ वाजेपर्यंतच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे उपबाजारात आवारात शेतकरी व हमाल, मापारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याप्रसंगी सभापती लक्ष्मणराव शेळके, संजय खैरनार, अनिल सांगळे, भारत मुंगसे, रवींद्र शेळके आदी.

Web Title: 5500 quintals of onion arrives in Nandurshingote sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.