गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 04:09 PM2019-08-08T16:09:36+5:302019-08-08T16:14:17+5:30

गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

5 thousand cusecs eradication from Godapur dam to Godavatar | गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग

गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग

googlenewsNext
ठळक मुद्दे गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग

नाशिक : गोदापात्रात दोन दिवसांपासून अडीच हजार क्युसेक पाण्याचा गंगापूर धरणातून विसर्ग केला जात होता; मात्र गुरूवारी (दि.८) सकाळी विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. सकाळपासून गोदापात्रात ५हजार १०२ क्ुयसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा गोदावरीच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होत आहे.
गेल्या रविवारी गोदावरीमध्येगंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली होती. सोमवारपासून पावासाचे प्रमाण धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तसेच शहरातही कमी झाल्याने विसर्गामध्ये घट केली गेली. ४५ हजारावरून थेट अडीच हजारापर्यंत विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदावरीची पूरस्थिती नाहीशी झाली. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस जिल्ह्यातील घाट प्रदेशात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविल्याने गोदाकाठाला पुन्हा सतर्कतच्या सूचना दिल्या गेल्या. गुरूवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस होऊ लागल्याने गोदापात्रात सुरू असलेल्या विसर्गात अडीच हजार क्युसेकने विसग वाढविला गेला. त्यामुळे सध्या ५हजार १०२क्युसेकचा विसर्ग होत असून अहल्यादेवी होळकर पूलाखालून ७ हजार ८३० क्युसेक पाण्याचा विसर्ग पुढे रामकुंडात होऊ लागला आहे. त्यामुळे गोदापात्रातील पाण्याची पातळी दुतोंड्या मारूती मूर्तीच्या कमरेपर्यंत आली आहे.
गुरू वारी सकाळपर्यंत गंगापूरमध्ये ८२, काश्यपीत ३२, गौतमीमध्ये ७६ तर त्र्यंबकमध्ये ९२ आणि अंबोलीत७९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे गंगापूरमध्ये नव्याने ३८६दलघफू पाणी पोहचले. त्यामुळे २ हजार ८०० वरून विसर्ग ५ हजार १००पर्यंत वाढविला गेला. गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

Web Title: 5 thousand cusecs eradication from Godapur dam to Godavatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.