सटाणा तालुक्यात एकाच दिवशी 48 कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 04:55 PM2020-09-06T16:55:35+5:302020-09-06T16:56:14+5:30

सटाणा : बागलाण तालुका आता कोरोना केंद्र बिंदू बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात 48 कोरोनाबाधित रु ग्ण आढळले असून, सर्वाधिक 16 रु ग्ण सटाणा शहरातील आहेत.

48 corona affected on the same day in Satana taluka | सटाणा तालुक्यात एकाच दिवशी 48 कोरोनाबाधित

सटाणा तालुक्यात एकाच दिवशी 48 कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे दोन दहा वर्षीय बालके आणि सहा महिलांचा समवेश

सटाणा : बागलाण तालुका आता कोरोना केंद्र बिंदू बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात 48 कोरोनाबाधित रु ग्ण आढळले असून, सर्वाधिक 16 रु ग्ण सटाणा शहरातील आहेत.
रविवारी (दि.6) सकाळी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांमध्ये वाढ होत आहे. पाचशेहून अधिक कोरोनाबाधित आढळले तर 17 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अहवालात सटाणा शहरातीलआंबेडकरनगर, माधवनगर, आरकेनगर, भाक्षी रोड या भागात सोळा बाधित सापडले आहेत. त्यामध्ये दोन दहा वर्षीय बालके आणि सहा महिलांचा समवेश आहे. तिळवण, देवळाणे, शेमळी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे.देवळाणे येथे दोन तर उर्विरत गावात प्रत्येकी एक कोरोना बाधित सापडला आहे.
मोसम खोर्यात थैमान
बागलाण तालुक्यातील मोसम खोर्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आजच्या अहवालात तब्बल 28 बाधित आढळले आहेत. त्यामध्ये वाघळे येथील सहा, नामपूर, अंतापूर, सोमपूर, ताहाराबाद, आसखेडा येथे प्रत्येकी चार, जायखेडा व निताणे येथे प्रत्येकी एक रु ग्ण सापडला आहे.

Web Title: 48 corona affected on the same day in Satana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.