32 people of swine flu in six months in the district | जिल्ह्यात सहा महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी
जिल्ह्यात सहा महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी

नाशिक : दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर  यशस्वी उपचार करून
त्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. स्वाइन फ्लूने नाशिक ग्रामीण जिल्ह्याबरोबरच नाशिक शहरातही बळी घेतले  आहे. 
हवेच्या माध्यमातून प्रवाहित होणाºया स्वाइन फ्लूचे यंदाही प्रमाण कायम असून, उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचे विषाणू कमी होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असले तरी, यंदा मात्र उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम राहिला. त्यातच जूनच्या दुसºया आठवड्यापासून हवामानात दमटपणा त्याच बरोबर पावसामुळे उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने जुलैच्या मध्यान्हापर्यंत जिल्ह्णात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले आहेत. एरव्ही शहरी भागापर्यंत मर्यादित असलेल्या स्वाइन फ्लूने ग्रामीण भागालाही विळखा घातल्याने सहा महिन्यांत ६६ रुग्णांचे रक्त नमुने स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह निघाले व त्यातून ११ जणांचा बळी गेला. शहरी भागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, मनमाड, भगूर व देवळाली या ठिकाणीही सुमारे १८५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले, त्यातील १५ जणांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची ग्रामीण भागातही वाढती लागण लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात टॉमीफ्लूचा पुरेसा साठा करून ठेवला असून, एक अथवा दोन दिवस उपचार करून रुग्णाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवून तेथेच त्यांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे सुमारे २५० रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे.
स्वाइन फ्लूची लागण होऊन २० पुरुष व १२ महिला अशाप्रकारे ३२ जणांचा बळी घेतला गेला असला तरी, साधारणत: वयाच्या ३६ ते ५५ वर्षांच्या व्यक्तींनाच त्याची लागण होऊन बळी गेला आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्येही प्रामुख्याने ३६ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश आहे. असाच चढता क्रम ४६ ते ५५ व पुढील वयोगटातील व्यक्तींसाठी आहे.
परजिल्ह्यातील रुग्णही नाशकात
नाशिक येथे उपचारासाठी येणाºया स्वाइन फ्लू बाधित रुग्णांमध्येनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, पालघर, सोलापूर, नेपाळच्या रहिवाशांचा समावेश आहे. त्यातील सहा रुग्ण उपचारार्थ दगावले.
परजिल्ह्यातील  रुग्णही नाशकात
नाशिक येथे उपचारासाठी येणाºया स्वाइन फ्लू बाधित रुग्णांमध्ये नगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, पालघर, सोलापूर, नेपाळच्या रहिवाशांचा समावेश आहे. त्यातील सहा रुग्ण उपचारात दगावले.


Web Title:  32 people of swine flu in six months in the district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.