१४ हजार मतदानयंत्रे झाली जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:35 AM2020-03-03T00:35:42+5:302020-03-03T00:36:34+5:30

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर ४५ दिवस सीलबंद करण्यात आलेल्या मतदान यंत्रांमधील डेटा डिलीट करून सदर यंत्रे पुन्हा वापरात आणली जात असल्याने जिल्ह्यातील सुमारे १४ हजार मतदानयंत्रांचा डेटा डिलीट करून सदर यंत्रे ही अगामी वर्षात होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील निवडणुकीसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्णातील मतदानयंत्रे अंबड येथील गुदामात पहिल्या पातळीतील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

3 thousand voting machines were deposited | १४ हजार मतदानयंत्रे झाली जमा

१४ हजार मतदानयंत्रे झाली जमा

Next
ठळक मुद्देयंत्रांमधील डेटा होणार डिलीट; दोन मतदारसंघांतील यंत्रे सुरक्षित

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर ४५ दिवस सीलबंद करण्यात आलेल्या मतदान यंत्रांमधील डेटा डिलीट करून सदर यंत्रे पुन्हा वापरात आणली जात असल्याने जिल्ह्यातील सुमारे १४ हजार मतदानयंत्रांचा डेटा डिलीट करून सदर यंत्रे ही अगामी वर्षात होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील निवडणुकीसाठी वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्णातील मतदानयंत्रे अंबड येथील गुदामात पहिल्या पातळीतील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातील १५ विधानसभा मतदारसंघापैकी मालेगाव आणि सिन्नर वगळता अन्य मतदारसंघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन जमा करण्यात आले आहे. सिन्नर आणि मालेगावमधील निकालावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे येथील मतदानयंत्रांमधील डाटा सुरक्षित ठेवला जाणार आहे. मात्र उर्वरित यंत्रांमधील डाटा डिलिट करून सदर यंत्रे बिहार येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर मतदानयंत्रे हे ४५ दिवस सुरक्षित ठेवले जातात. या यंत्रांमधील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी यंत्रांची काळजी घेतली जाते. या कालावधी कुणाचा आक्षेप आला नाही, तर सदर यंत्रांमधील मतदानाची आकडेवारी डिलिट केली जाते. त्यानुसार जिल्ह्णातील १३ मतदारसंघातील सुमारे १४ हजार यंत्रे निवडणूक शाखेने जमा केले असून, या यंत्रांची माहिती
काढून टाकली जाण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू केली जाणार आहे.
गेल्या आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्णातील १५ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गेल्या २४ आॅक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याने निकालाच्या ४५ दिवसांनंतर मतदानयंत्रामधील माहिती काढून सदर यंत्रे पुन्हा अन्य निवडणुकांसाठी वापरण्यात येतात. त्यानुसार आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे. विभागातील यंत्रांची प्रतीक्षानाशिक विभागातील नादुरुस्त मतदानयंत्रेदेखील नाशिकमध्ये जमा केली जाणार असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मतदानयंत्रे जमा करण्यासाठीचे पत्र जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आले आहे. येत्या १२ तारखेपर्यंत संबंधितांना मुदत देण्यात आली आहे. यातील मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली यंत्रे पुन्हा बंगळुरू येथील भेल कंपनीला परत पाठविली जाणार आहे.

Web Title: 3 thousand voting machines were deposited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.