८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:25 AM2019-08-22T01:25:23+5:302019-08-22T01:26:03+5:30

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.

 3 thousand hectares of crops in water | ८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

Next

नाशिक : मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.२ अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे नुकसानीत अधिकच भर पडली असून, अजूनही मोठ्या परिसरातील शेतीक्षेत्रावर पाणी साचल्याने पंचनामेदेखील रडखले आहेत.
यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्टÑापुढे मोठा प्रसंग उभा राहिला होता. त्यातच जूनमध्ये मान्सूनने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे विभागातल अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढतच गेली. अनेक तालुक्यांमधून तर कृत्रिम पावसाचीदेखील मागणी पुढे येऊ लागली होती. जुलैच्या दुसºया आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे संपूर्ण चित्र बदलून गेले आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये शेतपिकांचे नुकसान अधिक असून, अद्यापही अनेक भागातील शेतीमध्ये पाणी साचले आहे. (पान ५ वर)


त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्णात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील २२,३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्णात ८,१८५, नंदुरबारमध्ये १२,१५९, जळगावमध्ये १३,७४१ तर अहमदनगर येथील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून २७,४११ हेक्टर असे एकूण ८३,८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्णावर झाला असून नदीकाठावरील जनजीवन अद्यापही पूर्ववत होऊ शकलेले नाही.
अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील लाभार्थी आणि बाधित गावांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नाशिक जिल्ह्णातील ३२ हजार ६४९, धुळे जिल्ह्णात ९,२२८, नंदुरबारमध्ये २०,२३७, जळगावमधील १०,३४४ आणि नगरमधील ४७,५९२ याप्रमाणे एक लाख २० हजार बाधित लाभार्थी असून १७१५ गावांमधील नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे.
..या पिकांचे झाले नुकसान
सोयाबीन, कांदा, मका, बाजरी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आणि पडवळ ही पिके अतिवृष्टीत बाधित झालेली आहेत. विभागात ७७ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले असून ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची संख्या ५,८४७ हेक्टर इतकी आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

Web Title:  3 thousand hectares of crops in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.