नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 08:43 PM2019-09-12T20:43:54+5:302019-09-12T20:48:42+5:30

दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या.

28 artificial lakes in Nashik; Millions of Nashikar Ganesh devotees rush to prevent pollution of river | नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

Next
ठळक मुद्देमूर्ती, निर्माल्य संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिककरांनी दिला.गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून शहरातील नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यास हातभार लावल्याचे दिसून आले.

नाशिक - जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शहरात बाप्पांना पर्यावरणपूरक निरोप देण्यासाठी सहाही विभागांमध्ये कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली.एकूण २८कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भाविकांनी विधिवत गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून शहरातील नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यास हातभार लावल्याचे दिसून आले. दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या. मूर्ती, निर्माल्य संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिककरांनी दिला.

गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसापासून शहरातील निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांवर कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांनी सातव्या दिवशीदेखील कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे तसेच निर्माल्य येथे असणाऱ्या ‘निर्माल्य संकलन वाहनात टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील बाप्पांच्या विसर्जन अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यावर नाशिककरांनी भर द्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

कृत्रिम तलावांची ठिकाणे

नाशिक पूर्व

रामदास स्वामी मठ, आगर टाकळी
शिवाजीवाडी पूल
साईनाथनगर चौफुली इंदिरानगर
कलानगर चौक, रथचक्र सोसायटी
राजीवनगर शारदा शाळा

नाशिक पश्चिम

चोपडा लॉन्स पूल (गोदापार्क)
चव्हाण कॉलनी (परीचा बाग)

वनीकरण रोपवाटिका
येवलेकर मळा
उंटवाडी रोड, म्हसोबा मंदिर
महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ
लायन्स क्लब उद्यान नवीन पंडित कॉलनी

पंचवटी विभाग
पेठरोड आरटीओ कॉनर
दत्त चौक गोरक्षनगर-
कोणार्कनगर

नाशिक रोड
जेतवननगर जयभवानीरोड
शाळा क्र .१२३ मैदान
चेहेडी ट्रक टर्मिनस
नारायण बापू चौक जेलरोड
 

सातपूर 
सोमेश्वर मंदिर
शिवाजीनगर
अशोकनगर
पाइपलाइनरोड पेट्रोलपंपाशेजारी

नवीन नाशिक विभाग
डे केअर सेंटर शाळा
जिजाऊ वाचनालय- २
राजे संभाजी स्टेडियम
पवननगर स्टेडियम

‘अमोनियम बाय कार्बोनेट’ मोफत
महापालिका प्रशासनाच्या वतीने बाप्पांचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी सहाही विभागीय कार्यालयांमधून भक्तांना अमोनियम बाय कॉर्बोनेट पावडर मोफत पुरविलीे. या पावडरचा अधिकाधिक वापर नागरिकांनी केला.

 

Web Title: 28 artificial lakes in Nashik; Millions of Nashikar Ganesh devotees rush to prevent pollution of river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.