ठाणगाव आरोग्य विभागाच्या वतीने २६ ग्रामस्थ क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:13 PM2020-06-29T22:13:25+5:302020-06-29T22:13:48+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चौदा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांना आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ठाणगाव येथे बुधवारी (दि. २२) रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते, त्यानंतर त्या रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील दहा जणांचे तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल (दि. २८) रोजी पॉझिटिव्ह आल्याने ठाणगावची रुग्णसंख्या ही चौदा झाली.

26 village quarantine on behalf of Thangaon Health Department | ठाणगाव आरोग्य विभागाच्या वतीने २६ ग्रामस्थ क्वॉरण्टाइन

ठाणगाव आरोग्य विभागाच्या वतीने २६ ग्रामस्थ क्वॉरण्टाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चौदा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ लोकांना आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ठाणगाव येथे बुधवारी (दि. २२) रोजी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते, त्यानंतर त्या रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील दहा जणांचे तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल (दि. २८) रोजी पॉझिटिव्ह आल्याने ठाणगावची रुग्णसंख्या ही चौदा झाली.
ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. धादवड यांनी या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या २६ जणांना होम क्वॉरण्टाइन केले असून, बाधित कुटुंबाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांनी सात दिवस होम क्वॉरण्टाइन केले
आहे. सात दिवसांमध्ये जर कोणाला तीव्र ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे, असे आवाहन ठाणगावचे वैद्यकीय अधिकारी धादवड यांनी केले आहे.

Web Title: 26 village quarantine on behalf of Thangaon Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.