नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 11:18 PM2020-10-26T23:18:27+5:302020-10-27T00:29:50+5:30

नांदगाव : गारातून २६ बसेस सुरू झाल्या आहेत. बसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद ४० ते ४५% आहे.

26 buses started from Nandgaon depot | नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या

नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या

Next
ठळक मुद्देआगारात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे.

नांदगाव : आगारातून २६ बसेस सुरू झाल्या आहेत. बसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद ४० ते ४५% आहे. प्रवास करतांना प्रवासी तसेच चालक वाहक कोविडच्या नियमांचे पालन करत आहेत. काही वेळेस प्रवाशांकडून सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवतांना गर्दीनुसार अंतर कमी जास्त होते. अशावेळी वाहकाला अनेकदा समजावून सांगताना विवाहाचे प्रसंग उद्भवतात. परंतु सामंजस्याने ते मिटले जातात. नांदगाव आगाराला गेलेल्या महिन्यात ३३ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. आगारात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. एस टी व बसस्थानक रोज स्वच्छ केले जाते. दिवाळीसाठी पुणे, मालेगाव ते दिग्रस, पाचोरा तसेच प्रवासी गर्दी बघून त्या मार्गावर बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असल्या तरी ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत. शिवाय शाळा बंद आहेत. अनेक वेळा प्रवासी कोरोनाबद्दल जागरूक नसल्याने विवादाचे प्रसंग निर्माण होतात.- आगार व्यवस्थापक विश्वास गावित

 

Web Title: 26 buses started from Nandgaon depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.