बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:50 PM2019-11-29T15:50:33+5:302019-11-29T15:57:07+5:30

खाजगी प्रवाशी बस व्यावसायात गुंतवणूक केल्यास बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून उपनगर परिसरातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

2 lakh fraud by showing a lure of profit in bus business | बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

Next
ठळक मुद्देकर्नाटकातील संशयितांकडून नाशिकच्या व्यावसयिकाची फसणूक प्रवाशी बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून 43 लाखांचा गंडा

नाशिक :  खाजगी प्रवाशी बस व्यावसायात गुंतवणूक केल्यास बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून उपनगर परिसरातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास लाख  रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील संशयित आरोपी नवीन आचार्य याच्यासह इंदिरानगर येथील  मेघा कलकोट, समीर कलकोट, कल्पना पाटील ,श्रद्धा इंगोले यांनी उपनगरमधील  खोडे मळा परिसरातील  रमेश गवाल(  ७०)यांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केली. रमेश गवाल यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून त्यांच्या ओळखीचे मेघा कलकोट, कल्पना पाटील, श्रद्धा इंगोल व त्यांच्यासोबत समीर कलकोट यांनी फियार्दी गवाल यांना  कर्नाटक येथील नवीन आचार्य यांच्याकडून ओळखीने दोन बस घेऊन देतो अशी बतावणी करून फोनवर बोलणे करून दिले. तसेच मेघा व समीर कलकोट यांनी दिनांक २६ एप्रिलला बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये नवीन आचार्य याच्याशी मीटिंग करून दिली.यावेळी पन्नास लाख रुपयांच्या बदल्यात  दोन बस व त्यासोबतच करारपत्र पाठवून देतो. या बसेस बंगळुरू - मुंबई या मार्गावर चालून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दररोज दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला पाठविण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर रमेश गवाल यांच्याकडून वेळोवेळी रोख व चेकद्वारे ५० लाख रुपये यांच्याकडून घेतले त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सात लाख रुपये फियार्दी यांच्या खात्यावर पाठवलेही. परंतु, त्यानंतर पैसे पाठविणे बंद केले. त्यामुळे गवाल यांनी कलकोट यांना सांगितले असता आचार्य हा लवकर तुमच्या दोन बसेस व पंचवीस लाख रुपये परत करणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही  अद्यापपर्यंत पैसे परत मिळाले नसल्याने याप्रकरणी रमेश गवाल यांनी दिलेल्या फियार्दीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: 2 lakh fraud by showing a lure of profit in bus business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.