‘कडकनाथ’च्या व्यवसायात १४ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:12 AM2019-09-11T00:12:19+5:302019-09-11T00:12:44+5:30

नाशिक : कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात राज्यभरातून फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना नाशिकमध्येही महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सय्यद पिंप्री येथील शिवदास भिकाजी साळुंखे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली असून, पोलिसांनी कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

2 lakh fraud in 'Kadaknath' business | ‘कडकनाथ’च्या व्यवसायात १४ लाखांची फसवणूक

‘कडकनाथ’च्या व्यवसायात १४ लाखांची फसवणूक

Next
ठळक मुद्देमुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात राज्यभरातून फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना नाशिकमध्येही महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सय्यद पिंप्री येथील शिवदास भिकाजी साळुंखे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली असून, पोलिसांनी कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथील सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे, संदीप सुभाष मोहिते, शिवदास भिकाजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीच्या विराज टॉवरमधील कार्यालयात कर्मचाºयांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. त्यांनी कडकनाथ कोंबडीचे अंडे ३० रुपये प्रतिनग याप्रमाणे विकत घेण्याचे आश्वासन देत तीन लाख ७० हजार रुपयांच्या दहा युनिटमध्ये गुंतवणूक केली होती. 
त्याबदल्यात त्यांना दहा युनिटचे कोंबडीचे पिल्लेही देण्यात आली. ही पिल्ले शिवदास साळुंखे यांनी नियमानुसार वाढवितांना त्यातील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे १३ लाख ९० हजार रुपयांच्या कोंबड्या कंपनीने परत नेल्या. परंतु, त्याबदल्यात कोणतीही रक्कम अदा केली नसल्याने साळुंखे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 2 lakh fraud in 'Kadaknath' business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.