नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:46 AM2020-02-21T00:46:43+5:302020-02-21T00:47:22+5:30

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

1st prize at Nashik Road police station | नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, नीलेश माईनकर. समवेत उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी.

Next

नाशिकरोड : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील १३ पोलीस ठाण्यांसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत कामकाजात सुधारणा व प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय १४ मुद्द्यांवर प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. वर्षभरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे, खुनाच्या घटना, प्रतिबंधक कारवाई, स्वच्छता आदी विषयांवर ५ हजार गुणांचे मूल्यांकन पत्रिका तयार करण्यात आली. नाशिकरोड पोलीस ठाण्याने सर्वाधिक २५१२ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय- पंचवटी पोलीस ठाणे (२४४९ गुण), तृतीय- सातपूर पोलीस ठाणे (२४४३ गुण) व शहर वाहतूक शाखेच्या युनिट-२ यांनी १५०० पैकी ९८३ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला.
मूल्यांकनाचे काम पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले-श्रींगी व सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी केले.

Web Title: 1st prize at Nashik Road police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.