19 percent of the reserves in reservoirs | धरणांमध्ये अवघा १९ टक्के साठा
धरणांमध्ये अवघा १९ टक्के साठा

नाशिक : जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, एप्रिलच्या तिसºया आठवड्यातच जिल्ह्णातील धरणांतील पाणीसाठा जेमतेम १९ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्णातील ८६५ गावांना २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदा जिल्ह्णात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्णात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा, सुरगाणा व येवला या आठ तालुक्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर हेच प्रमाण ३३ टक्के इतके होते. शिवाय मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडण्यात येणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, तिसगावमध्ये दोन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता आठ तालुक्यांतील १९२ गावे व ६७३ वाड्या अशा ८६५ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ९३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात टॅँकरच्या संख्येने सव्वा दोनशेचा आकडा ओलांडला आहे.
तालुकानिहाय टॅँकर
बागलाण- ३३, चांदवड- ११, देवळा- ९, मालेगाव- ३९, नांदगाव- ५१, सुरगाणा- ३, सिन्नर- ५१, येवला तालुक्याला ४१ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


Web Title:  19 percent of the reserves in reservoirs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.