जिल्ह्यात १२०९ कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:29 PM2020-08-08T23:29:59+5:302020-08-09T00:07:33+5:30

नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रु पयांचे खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. तसेच या कर्जवाटपात पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटीपर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे, अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

1209 crore peak loans distributed to farmers in the district | जिल्ह्यात १२०९ कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप

जिल्ह्यात १२०९ कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थचक्र । जुन्या कर्जाची परतफेड करण्याचे कर्जदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रु पयांचे खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. तसेच या कर्जवाटपात पुढील आठवड्यापर्यंत ३०० कोटीपर्यंतचे कर्ज जिल्ह्यात वाटप करावे, अशा सूचना सर्व बँकर्सला देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
विविध सहकारी संस्था आणि बँकांचे थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी कर्जाची रक्कम भरून पुढील कर्जासाठी जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेकडे मागणी नोंदवावी. तसेच हे वाढीव कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध होणार असल्याने शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे विभाग स्तरावरील व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ज्या राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, व्यापारी बँका यांनी खरीप पीककर्ज वाटप अत्यंत कमी प्रमाणात केलेले आहे, त्यांना नोटीस देऊन खुलासा मागवा, अशी सूचना मांढरे यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर यांना केली. ...अशा आहेत मागण्या खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेत असताना मांढरे म्हणाले, मागील वर्षी ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकºयांना कर्जवाटप केलेले आहे अशा शेतकºयांची यादी वाढीव कर्जासाठी तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, व्यापारी बँकांना गटसचिवांनी उपलब्ध करून देण्यात यावी.

Web Title: 1209 crore peak loans distributed to farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.