१२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 08:19 PM2020-09-06T20:19:21+5:302020-09-06T20:20:54+5:30

नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे

12 victims: 1 thousand corona infected again found in Nashik | १२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

१२ बळी : नाशकात पुन्हा आढळले १ हजार कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देदिवसभरात जिल्हयात १ हजार २७२ संशियत रुग्ण

नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. दिवसभरात १२ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता बळींचा एकूण आकडा ९३३ झाला. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
सण-उत्सवांचा काळात शहरासह जिल्ह्यता अचानकपणे कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने आता प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. दिवसभरात जिल्हयात १ हजार २७२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ८५ रु ग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. रविवारी शहरात ७६८ तर ग्रामिण भागात ३५१ आणि मालेगावात ५३ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला. त्यापैकी ८ मनपा नाशिक शहरातील ग्रामिणमध्ये ३ व मालेगावात १ रुग्ण मृत्यूमुखी पडला. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती. दीडशे ते पावणेदोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत होते; मात्र रविवारी पुन्हा रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहचली. एकूणच शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुकापातळीवरसुध्दा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६६ रुग्ण बरे झाले आहेत तर ७ हजार ६९१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ५३७ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ३६६ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

 

Web Title: 12 victims: 1 thousand corona infected again found in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.