१२ हजार ७५२ विद्यार्थ्याना आरोग्य विद्यापीठाकडून पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:27+5:302021-06-23T04:11:27+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांतील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १२ हजार ७५२ विद्यार्थ्यांना ...

12 thousand 752 students graduated from Health University | १२ हजार ७५२ विद्यार्थ्याना आरोग्य विद्यापीठाकडून पदवी

१२ हजार ७५२ विद्यार्थ्याना आरोग्य विद्यापीठाकडून पदवी

Next

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांतील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १२ हजार ७५२ विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.२२) पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अनुमतीने विद्यापीठाची पुरवणी स्वरूपातील दीक्षांत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी २०१९ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व इंटर्नशिप पूर्ण केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत प्रक्रियेतून पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठ कायद्यानुसार दरवर्षी दोन वेळा पदवी प्रदान करण्यात येते. यातील पुरवणी दीक्षांत प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार विद्यापीठाने मंगळवारी (दि.१२) हजार ७५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली आहे.

इन्फो-

महाविद्यालयांना टपालाद्वारे प्रमाणपत्र

विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांत उपक्रमात हिवाळी-२०२० सत्रातातील उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या १७०५ विद्यार्थ्यांना तसेच पदवी अभ्यासक्रमाचे हिवाळी-१०१९ व तत्सम विद्याशाखेचे उन्हाळी-२०२० सत्रातील ११ हजार ४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. पुरवणी प्रक्रियेत पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयांकडे टपालाद्वारे पाठविण्यात आले असून, संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे संपर्क साधून पदवी प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या सूचना विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.

इन्फो-

शाखानिहाय पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी

हिवाळी-२०१० सत्र पदवी अभ्यासक्रम

वैद्यकीय - ४२५१

दंत वैद्यकीय - ४९३

आयुर्वेद -२५५१

युनानी -२५०

होमिओपॅथी -२०५५

बेसिक नर्सिंग -५४३

पोस्ट बेसिक नर्सिंग -१४२

बीएएसएलपी -०७

---

उन्हाळी-२०२० सत्र

बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (बीओटीएच) ६७

बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपी टीएच) -६६२

बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स (बीपीओ) -२५२

---

हिवाळी-२०२० सत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

वैद्यकीय विद्याशाखा -१०२

मास्टर ऑफ डेन्टल सर्जरी (एमडीएस) ०७

बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नालॉजी - ६९

नर्सिंग विद्याशाखा - २४४

आर्युेवेद व होमिओपॅथी -१२८३

---

Web Title: 12 thousand 752 students graduated from Health University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.