११८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:10+5:302021-07-28T04:16:10+5:30

नाशिक शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागातसुद्धा कोरानाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरीदेखील नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे ...

118 patients overcome coli coli | ११८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

११८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next

नाशिक शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागातसुद्धा कोरानाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरीदेखील नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होऊ लागली आहे. मंगळवारी शहरात ४१, ग्रामीण भागात ५० तर मालेगावात शून्य रुग्ण आढळून आले. जिल्हा बाह्य ४ रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा ८ हजार ५०१ इतका झाला आहे. दिंडोरी, येवला, चांदवडमध्ये प्रत्येकी २ तसेच सिन्नर, निफाडमध्ये प्रत्येकी १७ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा एकूण २ लाख २८ हजार १५९ रुग्ण तर जिल्ह्यात एकूण ४ लाख २ हजार १३७ इतका झाला आहे. सध्या १ हजार २२७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.५८ इतकी आहे. चाचणीसाठी पाठविलेलेे २ हजार ३३९ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Web Title: 118 patients overcome coli coli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.