पांगरीचे ११ जण सिन्नर रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:38 PM2020-05-24T21:38:57+5:302020-05-24T21:41:14+5:30

मुंबई येथून आलेले पती-पत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ११ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे तर १२ लो रिस्कमधील ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

11 people from Pangri are in Sinnar hospital | पांगरीचे ११ जण सिन्नर रुग्णालयात

पांगरीचे ११ जण सिन्नर रुग्णालयात

googlenewsNext
ठळक मुद्देकंटेन्मेंट झोन : १२ जण होम क्वारंटाईन; सर्व्हेस प्रारंभ

पांगरी : येथे मुंबई येथून आलेले पती-पत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ११ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे तर १२ लो रिस्कमधील ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रविवारी तहसिलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी पांगरी येथे भेट देऊन सूचना केल्या. रुग्णाच्या कुटुंबियाना आणि संपर्कात आलेल्या एका कुटुंबास तात्काळ सिन्नर येथे हलविण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले. त्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पांगरी खुर्द आणि पांगरी बुद्रुक या दोन्ही गावांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाची एक टीम २१२ लोकसंख्या असलेल्या पांगरी-निरहाळे रडत्यावरील ४0 घरांचा रोज सर्व्हे करणार आहे.
गावातच कॉरंटाइन सेंटर...
तहसीलदार राहुल कोताड़े यांनी गावातील श्री संत हरीबाबा विद्यालयात तात्काळ कॉरंटाइन सेंटर उभारण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे अथवा दुसऱ्या गांवाहुन कोणी नागरीक पांगरी येथे आल्यास त्यांना १४ दिवस विद्यालयाच्या इमारतीत कॉरंटाइन केले जाणार आहे. त्यांच्या जेवनाची व्यवस्था संबंधित माणसाच्या कुटुंबियांना करावी लागणार आहे.

Web Title: 11 people from Pangri are in Sinnar hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.