मनपाला अकरा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:44 AM2019-10-12T01:44:23+5:302019-10-12T01:45:34+5:30

घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ८५ कोटी आत्तापर्यंत वसूल झाले आहेत. निवडणूक कामात बहुतांशी कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी विभागाची अडचण झाली आहे.

11 crore to the corporation | मनपाला अकरा कोटी

मनपाला अकरा कोटी

Next
ठळक मुद्देअभय योजना फलदायी : यंदा नियमित वसुलीचे ८५ कोटी जमा

नाशिक : घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ८५ कोटी आत्तापर्यंत वसूल झाले आहेत. निवडणूक कामात बहुतांशी कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी विभागाची अडचण झाली आहे.
महापालिकेच्या घरपट्टी विभागात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. जुनी थकबाकी वसूल करताना अनेक अडचणी असून मूळ रकमेबरोबरच शास्तीदेखील लावली जात असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी महापालिकेने थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याचा धडाका सुरू केल्यानंतर काही प्रमाणात वसुली झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ढेपाळली. प्रशासनाने काही बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे लिलाव काढले होते, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, आता महापालिकेने सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी शास्तीत सवलत देऊन वसुलीची अभय योजना जारी केली होती. १६ ते ३० सप्टेंबर राबविलेल्या योजनेत ७५ टक्के सवलत होती. त्यात एकूण ९ कोटी रुपये वसूल झाले होते. त्यानंतर आता १ ते १० आॅक्टोबर दरम्यान शास्तीत ५० टक्के सूट देऊन योजना राबविण्यात आली होती. यात ४ हजार ५७१ नागरिकांनी २ कोटी ५३ लाख ३१ हजार ४३ रुपये वसुली करण्यात आली आहे.
विभागनिहाय वसुलीची कामगिरी
सातपूर विभागातील ४८५ थकबाकीदारांनी २८ लाख २८ हजार ५१२ रुपये, नाशिक पश्चिम विभागात ३१ लाख ७५ हजार ८६२ रुपये, नाशिक पूर्व विभागातून ८३२ थकबाकीदारांनी ६२ लाख २५हजार ६५२ रुपये, पंचवटी विभागातून ९१२ थकबाकीदारांनी ४५ लाख ३९ हजार ९२६ रुपये त्याचप्रमाणे सिडको विभागातून १ हजार ७९ थकबाकीदारांनी ४६ लाख ०३ हजार १३८, तर नाशिकरोड विभागातून ८३४ थकबाकीदारांनी ३९ लाख ५७ हजार ९५३ रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली आहे.

Web Title: 11 crore to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.