शहरात आज नवे १०८ कोरोनाबाधित; सहा रूग्णांचा दिवसभरात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:27 PM2020-06-21T21:27:23+5:302020-06-21T21:29:28+5:30

महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे

108 new corona affected in the city today; Six patients died during the day | शहरात आज नवे १०८ कोरोनाबाधित; सहा रूग्णांचा दिवसभरात मृत्यू

शहरात आज नवे १०८ कोरोनाबाधित; सहा रूग्णांचा दिवसभरात मृत्यू

Next
ठळक मुद्दे०४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे६४३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.नाशिक महापालिकेतील १ हजार १५९ रुग्ण

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचा कहर अधिकाधिक रौद्रावतार धारण करू लागला आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि रुग्णांचा मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे मात्र बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दीदेखील कायम आहे. रविवारी (दि.२१) महापालिका हद्दीत तब्बल १०८ नवे कोरोनाबाधित आढळून आले तर ६ रूग्ण मृत्यूमुखी पडल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता पावणे तीन हजार अर्थात २ हजार ७१६ इतका झाला आहे. यामध्ये नाशिक महापालिकेतील १ हजार १५९ रुग्ण तर मालेगाव मनपामधील ९२९ आणि नाशिक ग्रामिण मधील ५४४ आणि जिल्हा बाह्य ८४ रुग्णांचा समावेश आहे.

शहर व परिसरात महापालिकेकडून सातत्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू असले तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविणे अवघड होत आहे. महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका हद्दीत रविवारी १०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. महापालिका हद्दीतील कोरोना रूग्णांची संख्या आता १ हजार २०९ इतकी झाली आहे. एकूण ६२ लोकांचा मृत्यू अद्याप झाला आहे. ५०४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. ६४३ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.
रविवारीसुध्दा पंचवटी, जुने नाशिक, पखालरोड, नाशिकरोड या भागातील रुग्णसंख्या अधिक आहेत. जुन्या नाशकातील बुधवार पेठ, जोगवाडा, पिंजारघाट, कथडा, गंजमाळ, खडकाळी, द्वारका या भागात एकूण ९ रुग्ण मिळून आले. तसेच पखालरोडवरील गुलशन कॉलनी-३, रॉयल कॉलनी-१ पखालरोड-५ असे एकूण ९ रुग्ण या भागात मिळून आले आहे. वडाळागावात एक वर्षाचा मुलासह ७० वर्षीय वृध्द महिला तर वडाळ्यातील गणेशनगरमध्ये २० वर्षीय तरूण आणि मेहबुबनगर वसाहतीत ११ वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. वडाळागावात पुन्हा ४ नवे रुग्ण मिळाले.
पंचवटीमधील फुलेनगर-१, हिरावाडी-१, बळी मंदिर परिसर-१, पंचवटी कारंजा-१, स्नेह नगर दिंडोरीरोड-२, दिंडोरीरोड-१, हनुमानवाडी-१ आणि टकलेनगर-३ असे ११ रूग्ण मिळाले. तर नाशिकरोड भागात जयभवानी रोड-१, गोसावीवाडी-१ असे दोन रूग्ण मिळाले. तसेच सातपूर भागातील मुळ सातपूरमध्ये १, श्रमिकनगर-२, टिळकवाडी-१ तर सिडकोमध्ये औदुंबर चौक-२, सिडको-२ असे एकूण ४९ रुगण हे रात्री साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार पॉसिटिव्ह आले.
*उर्वरित उपनगरनिहाय आकडेवारी लवकरच देत आहोत....
----
या भागातील रुग्ण मृत्यूमुखी
काठे गल्लीमधील ४५ वर्षीय महिला.
बागवानपुऱ्यातील ७२ वर्षीय वृध्द महिला.
फुलेनगर येथील ६५ वर्षीय वृध्द महिला.
त्रिमुर्तीनगर मायको रुग्णालय परिसरातील ६५वर्षीय पुरूष
केतकीनगरमधील ६७ वर्षीय वृध्द व्यक्ती
वृंदावन कॉलनी, पखालरोडवरील ७० वर्षीय वृध्द पुरूष.
 

Web Title: 108 new corona affected in the city today; Six patients died during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.