येवल्यातील १० बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:19 PM2020-07-29T20:19:09+5:302020-07-30T01:53:55+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील १० बाधित बुधवारी कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर शहरातील आंबीया शाह कॉलनीतील एकाच कुटुंबातील ६ अहवाल रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये पॉझीटीव्ह आले आहेत.

10 affected corona free in Yeola | येवल्यातील १० बाधित कोरोनामुक्त

येवल्यातील १० बाधित कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील ६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरासह तालुक्यातील १० बाधित बुधवारी कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर शहरातील आंबीया शाह कॉलनीतील एकाच कुटुंबातील ६ अहवाल रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये पॉझीटीव्ह आले आहेत.
बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून ५ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून ५ असे शहरासह तालुक्यातील एकूण १० बाधित बुधवारी (दि.२९) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५४ झाली असून यापैकी आजपर्यंत २१५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
आत्तापर्यंत १७ जणांचा कोरोनाने बळी गेला असून बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या २२ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधित २३ रूग्णांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ८, बाभुळगाव येथील विलगीकरण कक्षात १३ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १ रूग्णांवर औषधोपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: 10 affected corona free in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.