पाटपिंप्रीत ४२ जण होम क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:20 PM2020-04-04T22:20:50+5:302020-04-04T23:52:05+5:30

सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला.

1 person homemade quarantine | पाटपिंप्रीत ४२ जण होम क्वॉरण्टाइन

पाटपिंप्रीत ४२ जण होम क्वॉरण्टाइन

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला

सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. सरपंच भानुदास उगले, ग्रामविकास अधिकारी शेषराव धीवर यांनी परगावहून आलेल्या सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यांसह राज्यातील विविध औद्योगिक नगरांमधून तरुण गावात दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदी व लॉक डाउनच्या काळात ते गावी परतले आहेत. त्यांची माहिती आरोग्यसेवक, सेविकांना कळविण्यात येऊन वैद्यकीय तपासण्या करण्याची सूचना देण्यात आली.
याप्रसंगी पोलीसपाटील विजय उगले, सोमनाथ उगले, नवनाथ वाळुंज, सावळीराम उगले, शिवाजी हारणे, मुख्याध्यापक आरोटे, अंगणवाडी कार्यकर्ती वैशाली उगले, शैला एरंडे, अनुराधा उगले, आशा वर्कर मनीषा ताकाटे, सविता ताकाटे, ग्रामपंचायत कर्मचारी अण्णा उगले, बाळू ढेंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: 1 person homemade quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.