श्रावणी जवळ अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:52 AM2020-11-22T11:52:56+5:302020-11-22T11:53:03+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी  :  विसरवाडी -नंदुरबार मार्गावर श्रावणी येथे कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एक ...

Youth killed in accident near Shravan | श्रावणी जवळ अपघातात युवक ठार

श्रावणी जवळ अपघातात युवक ठार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी  :  विसरवाडी -नंदुरबार मार्गावर श्रावणी येथे कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एक जण ठार तर दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
       विसरवाडी- नंदुरबार रस्त्यावर  खांडबारा येथून   एमएच ४१ टी ५२४० या माेटरसायकलने संतोष रविंद्र कोकणी,  देविदास सुरेश कोकणी व संतोष नंदूलाल कोकणी हे तिघेही ढोंग गावाकडे जात असताना  विसरवाडी कडून नंदुरबार कडे जाणा-या एम एच १५ ईबी २३६५ या कारसोबत अपघात झाला. दोघी वाहने समोरासमोर धडकल्याने  दुचाकीवरील तिघे फेकले गेेल्याने जखमी झाले.  त्यांना  खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता संतोष रविंद्र कोकणी  (१९) रा. श्रावणी यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान याबाबत देविदास सुरेश कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस काॅन्स्टेबल विश्वास गावीत करत आहेत.

Web Title: Youth killed in accident near Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.