विद्यार्थीनीचा विनयभंग अक्कलकुवा येथील युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:57 PM2019-08-24T12:57:07+5:302019-08-24T12:57:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. 22 रोजी सायंकाळी ही ...

Young man arrested for violating student | विद्यार्थीनीचा विनयभंग अक्कलकुवा येथील युवकाला अटक

विद्यार्थीनीचा विनयभंग अक्कलकुवा येथील युवकाला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. 22 रोजी सायंकाळी ही घटना घडली. अक्कलकुवा पोलिसात अॅट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललीत एकनाथ परदेशी, रा.अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. सोरापाडा भागातील गेल्या अनेक दिवसांपासून ललीत हा विद्यार्थीनीच्या मागे लागला होता. 22 रोजी सायंकाळी विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असतांना तिचा रस्ता अडवून त्याने विद्यार्थीनीला तुला ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्याबरोबर घरी चल अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थीनीने तेथून पळ काढला. 
घरी ही बाब सांगितल्यावर मुलीच्या फिर्यादीवरून ललीत परदेशी विरुद्ध विनयभंग आणि अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. तपास     पोलीस उपअधीक्षक सपकाळे करीत आहे. 

Web Title: Young man arrested for violating student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.