दुर्गपूजन दिनानिमित्त बारगळ गढीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:03 PM2020-02-24T14:03:52+5:302020-02-24T14:04:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दुर्गपूजन दिनानिमित्त तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूची ...

Worship of Bargal Garhi on the occasion of Durga Pujan | दुर्गपूजन दिनानिमित्त बारगळ गढीचे पूजन

दुर्गपूजन दिनानिमित्त बारगळ गढीचे पूजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : दुर्गपूजन दिनानिमित्त तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीच्या प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूची सांस्कृतिक माहितीचे जतन व संर्वधनसाठी दुर्गपूजन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
नबारगळ गढीच्या प्रवेशद्वार पूजन कार्यक्रमास बारगळ गढीचे वंशज जहागिरदार अमरजित बारगळ, आतिष बारगळ, नीरज बारगळ ऋषिकेश बारगळ उपस्थित होते. गढीच्या प्राचीन वास्तू सोबतच ध्वज पूजन, विविध हत्यारे यांचे देखील पूजन करण्यात आले़ याप्रसंगी तळोद्याचे जहागीरदार बारगळ यांनी दुगंर्पूजन उपक्रमाची माहिती देतांना सांगितले की, मागील तीन वर्षांपासून या उपक्रमाची सुरुवात तळोद्यातून करण्यात आली. हा उपक्रम राज्यात गेल्या २३ वर्षांपासून राबविला जात आहे.
प्राचीन ऐतिहासिक वास्तूची जतन व संवर्धन व्हावे तसेच सांस्कृतिक वारशाची माहिती युवा वर्गाला व्हावी या उद्देशाने उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील मिलिंद क्षिरसागर यांची हि संकल्पना होती. यावर्षी तळोद्यासह थाळनेर, तोरखेडा याठिकाणी देखील दुर्गपुजन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. खान्देशातील ऐतिहासिक वास्तू म्हणून गढीची ओळख आहे.

Web Title: Worship of Bargal Garhi on the occasion of Durga Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.