वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:08 PM2019-12-13T12:08:37+5:302019-12-13T12:08:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना ...

Workers' workout to arrive on time | वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना धावपळ करावी लागत आहे. हे कामगार जीवाचा धोका पत्करुन रिक्षाच्या टपावर बसून प्रवास करीत आहे.
जिल्ह्यातील मजुरांना बांधकाम व शेतमजुरीशिवाय दुसरा कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रोजगाराच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. शहरी भागातील मजुरांना कामावर जाण्यासाठी कुठल्याही वेळेस वाहन उपलब्ध होत असते. ही बाब ग्रामीण भागातील मजुरांच्या नशिबात नसल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रकाशा, तºहावद, वैजाली, काथर्दे या भागातील मजुरांना देखील वेळेवर व अपेक्षेनुसार वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली नाही. या भागात परिवहन महामंडळाच्या फारशा बसेस जात नाही, त्यामुळे तेथील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. वाहतुकीच्या सुविधेअभावी या भागातील शेतमजूर व बांधकाम कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या कामगारांना अल्पश: खाजगी वाहतुकीवरच विसंबून राहावे लागत आहे.
या भागातील बहुतांश रस्त्यांची अरुंद, खड्डे पडलेले, खचलेल्या साईडपट्या अशी परिस्थिती आहे. अशा या रस्त्यांवरुन रिक्षांच्या टपावर बसून मजूरांना प्रवास करावा लागत आहे. ही वाहतुक या मजूरांच्या जीवाला धोक्याची ठरत आहे. धोका असला तरी कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी या मजूरांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते टपावर का असेना बसून वेळेवर नियोजित कामावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या मजुरांसह अन्य नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून आवश्यकतेनुसार बस उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

रिक्षाच्या टपावरुन होणाºया प्रवासी वाहतुकीत रिक्षाचालक अथवा प्रवाशांचा दोष नव्हे हा तर गरिबी व वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देणाºया यंत्रणेचा असल्याचे म्हटले जात आहे. कामावर वेळेवर न पोहोचल्यास या कामगारांना त्या-त्या दिवसाचा रोज बुडवावा लागतो.
या भागातील सर्व मजुरांचा उदरनिर्वाह हा केवळ हातावर अवलंबून आहे. त्यामुळे या मजुरांना एका दिवसाचा रोज बुडाल्यास त्या मजुरासह त्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ येते.
कुटुंबियांची संभाव्य उपासमार टाळण्यासाठी मजुरांनी वेळेवर कामावर पोहोचणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या मजुरांकडून धावपळ करीत मिळेल त्या वाहनाने वेळेतच कामावर पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रकाशा ते काथर्देदिगर या भागातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी प्रतिकुल देखील ठरतात. खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे प्रवाशांना धोका अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत मजूर प्रवास करीत आहे.

Web Title: Workers' workout to arrive on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.