कार्यकत्र्यानी पक्ष सोडणा:यांची चिंता करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:22 AM2019-11-20T11:22:16+5:302019-11-20T11:22:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. जनता सोबत असल्याचे एकदा दाखवून ...

Workers leaving the party: Don't worry about them | कार्यकत्र्यानी पक्ष सोडणा:यांची चिंता करु नये

कार्यकत्र्यानी पक्ष सोडणा:यांची चिंता करु नये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. जनता सोबत असल्याचे एकदा दाखवून दिले आहे. यामुळे पक्ष सोडणा:यांची कार्यकत्र्यानी चिंता करू नये, पुन्हा नव्या उमेदीने सक्रीय व्हावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चौपाळे ता़ नंदुरबार येथे केल़े
जिल्ह्यातील शेतक:यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्ह्याच्या दौ:यावर आल्या होत्या़ यावेळी चौपाळे येथे त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला़ 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी,  युवकचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल भारती, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रदेश सचिव सुवर्णा बागल, नीता गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादू गावीत, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ वळवी, उपसरपंच सारिका तांबोळी, विठ्ठल पटेल, सुरेंद्र कुवर, छायाबाई पटेल, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रकाश मगरे, योगेश पाटील, दिनेश पाटील  उपस्थित होत़े
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सरकारी नोकर भरती बंद करण्यात आल्याने बेरोजगारी वाढली आह़े परदेशी कंपन्यांचे कर्ज माफ करण्यात आले आह़े राज्यातील नुकसानग्रस्त शेतक:यांना कोणताही न्याय दिलेला नाही़ दूरसंचार विभागाच्या 74 हजार कर्मचा:यांवर टांगती तलवार आह़े युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांनीही मनोगत व्यक्त केल़े प्रास्ताविक अमोल भारती यांनी        केल़े 
मेळाव्यात उपस्थित महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली़ 


मेळाव्यात प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी कार्यकत्र्यानी पक्षाच्या कामाला पुन्हा सक्रीय होऊन काम करावं असे सांगून लवकरच जिल्हाध्यक्ष व पदाधिका:यांच्या नियुक्त्या होणार असल्याचे जाहिर केल़े तसेच कार्यकत्र्यानी जिल्हा परिषदेच्या निवडणूकांमध्ये पक्षाची ताकद दाखवावी असेही त्यांनी सांगितल़े निवडणूकीनंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका:यांसह पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े मेळाव्यादरम्यान चाकणकर यांनी ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेवर टिका सुरु केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता़ 
 

Web Title: Workers leaving the party: Don't worry about them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.