मोटारसायकल अपघातात काकर्दे येथील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:05 PM2020-02-26T13:05:33+5:302020-02-26T13:05:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काकर्दे ते जुनमोहिदे रस्त्यावर ...

Woman killed in motorcycle accident | मोटारसायकल अपघातात काकर्दे येथील महिला ठार

मोटारसायकल अपघातात काकर्दे येथील महिला ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काकर्दे ते जुनमोहिदे रस्त्यावर डिसेंबर २०१९ मध्ये घडली होती़ याप्रकरणी सोमवारी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मिनाबाई संतोष अहिरे (२५) असे मयत महिलेचे नाव असून त्या काकर्दे ता़ नंदुरबार येथील रहिवासी आहेत़ १९ डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ दरम्यान पोलीस तपासात त्यांचा मृत्यू हा दुचाकीच्या अपघातात झाल्याचे स्पष्ट झाले होते़ यातून सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश वसावे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करत आहेत़ पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत़

Web Title: Woman killed in motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.