बेडकी येथे महिलेस डेंगाऱ्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:10 PM2020-02-26T13:10:19+5:302020-02-26T13:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बेडकी येथे घराच्या सºयाचे लाकूड कापण्याच्या वादातून महिलेस डेंगाºयाने मारहाण करण्यात आली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बेडकी येथे घराच्या सºयाचे लाकूड कापण्याच्या वादातून महिलेस डेंगाºयाने मारहाण करण्यात आली़ ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली़
सुमनबाई नरेश गावीत असे मारहाणीतील जखमी महिलेचे नाव आहे़ सुमनबाई यांच्या घराशेजारीच प्रताप वेच्या गावीत याचे घर आहे़ रविवारी अनिताबाई यांच्या घराचे सºयाचे लाकूड कापल्याचा राग आल्यानंतर प्रताप गावीत याने सुमनबाई यांच्यासोबत वाद घालून लाकडी डेंगाºयाने मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ या मारहाणीत सुमनबाई ह्या जखमी झाल्या़ त्यांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याबाबत त्यांनी सोमवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित प्रताप गावीत याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़