ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:08 PM2020-02-24T14:08:48+5:302020-02-24T14:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या तालुक्यातील धजापाणी, केलवापाणी, माळखुर्द या गावांना आमदार राजेश पाडवी यांनी प्रथमच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या तालुक्यातील धजापाणी, केलवापाणी, माळखुर्द या गावांना आमदार राजेश पाडवी यांनी प्रथमच भेट दिली. या वेळी धजापाणी येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी प्रश्न व वीज प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार पाडवी यांनी आपल्या स्थानिक निधीतून तत्काळ चार हातपंप देण्याचे आश्वासन दिले. आपल्या गावात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच आमदार आल्याने गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता.
आमदार राजेश पाडवी हे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गावकºयांशी संवाद साधत आहेत. आतापावेतो त्यांनी शहादा-तळोदा तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गावातील समस्यांबाबत पाठपुरावा केला आहे. शनिवारीदेखील त्यांनी तळोदा तालुक्यातील केवलापाणी, धजापाणी व माळखुर्द या दुर्गम भागातील गावकºयांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या वेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, तळोदा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाडवी, पंचायत समती सदस्य विजय राणा, माळद्याचे सरपंच गोपी पावरा, छगन कोठारी, जोलू वळवी, भाईदास वळवी, सजन शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, रवींद्र भिलाव, बाबुलाल पावरा आदी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार पाडवी यांच्या हस्ते नवीन बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गावकºयांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी गावकºयांनी धजापाणी गावात पिण्याचे पाणी, विजेचा प्रश्च मोठा असून तो मार्गी लावण्याची मागणी केली. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आमच्यावर येत असते. त्या वेळी आमदार पाडवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून गावात पाच हातपंप, एक बोअरवेल देण्याचे ठोस आश्वासन दिले. याशिवाय विजेसाठी सौर दिवे देण्याचे सांगितले. यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याची सूचनादेखील संबंधीतांनी दिली. त्याचबरोबर केवलपाणी व माळखुर्द येथील गावकºयांची भेट घेतली. तेथे गावकºयांनी रस्त्यांची मागणी केली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते करण्याचे आश्वासन दिले.