दोन दिवसात ४४० जणांनी चाखला स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:47 AM2020-01-28T11:47:29+5:302020-01-28T11:47:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रम सुरूवात झाली असून दोन दिवसात ४४० ...

Two people tasted it in two days | दोन दिवसात ४४० जणांनी चाखला स्वाद

दोन दिवसात ४४० जणांनी चाखला स्वाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात दोन ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रम सुरूवात झाली असून दोन दिवसात ४४० जणांनी हे अन्न चाखल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ शहरात २६ जानेवारीपासून शिवभोजन सुरू झाले आहे़
दहा रुपयांमध्ये पोटभर जेवन या उपक्रमाअंतर्गत आघाडी सरकारने शिवभोजन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि जिल्हा रुग्णालय याठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयात स्त्री शक्ती संस्था तर बाजार समितीत बाजार समिती व्यवस्थापन शिवभोजन देत आहे़ स्त्री शक्तीतर्फे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी मध्यवर्ती किचन चालविले असल्याने त्यांच्याकडून गेल्या दोन दिवसात जिल्हा रुग्णालय आवारात अनेकांना पोटभर अन्न देण्यात आले आहे़ सोमवारी बाजार समितीतील केंद्रातून १५० थाळ्या वितरीत झाल्या होत्या़ रविवारी केंद्राचे उद्घाटन झाले असले तरी सुटी असल्याने पहिल्या दिवशी ४१ जणांनीच जेवण केले होते़ यातून दोन दिवसात येथे १९१ जणांची नोंद झाली़
दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळपासून १०१ जणांनी भोजनाचा लाभ घेतला़ सोमवारी यात वाढ होऊन ही संख्या १४८ एवढी झाली़ जिल्हा रुग्णालयात मुक्काम करणाऱ्या रुग्णांच्या नातलगांना या शिवभोजनाचा आधार मिळाला आहे़ योग्य त्या पद्धतीने मिळणाºया या जेवणासाठी दोन्ही केंंद्रात सोमवारी रांगा लागल्याचे दिसून आले़
नंदुरबार बाजार समितीत यापूर्वीपासूनच १५ रुपयात पोटभर जेवण दिले जाते. कृषीमाल विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांसाठी खास बाजार समितीने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे़ यात शिवभोजनची सोय झाल्याने शेतकºयांनी आनंद व्यक्त केला होता़ जिल्हा रुग्णालयातील केंद्राबाबतही समाधान व्यक्त करण्यात आले होते़

Web Title: Two people tasted it in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.