आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभाराने परीक्षार्थी शिक्षक टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:03 PM2019-08-17T13:03:53+5:302019-08-17T13:03:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील अप्पर आयुक्तांकडून होणा:या विशेष शिक्षक भरती मोहिमेंतर्गत परीक्षार्थी शिक्षकांची ...

Tribal Development Department suspended the examination teacher | आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभाराने परीक्षार्थी शिक्षक टांगणीला

आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभाराने परीक्षार्थी शिक्षक टांगणीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील अप्पर आयुक्तांकडून होणा:या विशेष शिक्षक भरती मोहिमेंतर्गत परीक्षार्थी शिक्षकांची सध्या परवड सुरु आह़े विभागाकडून परीक्षार्थीना गोंधळात टाकणारे संदेश पाठवण्यात येत असल्याचे प्रकार होत आहेत़ 
आदिवासी विकास विभागातर्फे नाशिक अप्पर आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा:या शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालयासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती़ यांतर्गत परीक्षा घेण्यात आल्या असून बी़एड, डीएड आणि विशेष प्रशिक्षण प्राप्त शिक्षकांची निवड होणार आह़े परीक्षा होऊन बराच कालावधी लोटला असल्याने परीक्षार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होत़े दरम्यान 5 ऑगस्ट रोजी महाऑनलाईन या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाकडून परीक्षार्थी शिक्षकांना संदेश पाठवण्यात आले होत़े यात शिक्षक पदासाठी परीक्षा दिलेल्या सर्व परीक्षार्थीनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातून परीक्षा निकालांच्या श्रेणीचे शेकडेवारीत रुपांतरण करुन आणण्याचे म्हटले होत़े यानुसार बहुतांश परीक्षार्थी तातडीने जळगाव येथे गेल़े 10 ऑगस्ट अंतिम मुदत असल्याने दुर्गम भागासह विविध ठिकाणचे विद्यार्थी विद्यापीठात गेले होत़े त्याठिकाणी परीक्षा विभागातून अशा प्रकारचे कोणतेही कामकाज होत नसल्याचे सांगून हात झटकले होत़े संबधित विभागाने श्रेणीचे शेकडेवारी रुपांतर करण्याचे कोणतेही पत्र दिलेले नसल्याचे विद्यापीठाने सांगितल़े सुमारे 300 पेक्षा अधिक परीक्षांर्थी रिकाम्या हाताने परतले होत़े 
आदिवासी विकास विभागाकडून भरती प्रक्रियेचा निकाल देण्याऐवजी ब्रेक लावला जात असल्याचे परीक्षांर्थीचे म्हणणे आह़े परीक्षांर्थीनी मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या संदेशाबाबत तळोदा प्रकल्प कार्यालयात संपर्क करुनही त्यांना योग्य ती माहिती देण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने परीक्षेच्या निकालासंबधी योग्य ती कारवाई करण्याची मागणी परीक्षार्थीकडून होत आह़े     

Web Title: Tribal Development Department suspended the examination teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.