मंदीचा बागुलबुवा करत पपईचे दर व्यापाऱ्यांनी पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:26 PM2020-02-27T13:26:08+5:302020-02-27T13:26:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदीचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला १४ रुपये दर देण्यास असमर्थता ...

Traders hit the recession and papaya prices fell | मंदीचा बागुलबुवा करत पपईचे दर व्यापाऱ्यांनी पाडले

मंदीचा बागुलबुवा करत पपईचे दर व्यापाऱ्यांनी पाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदीचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला १४ रुपये दर देण्यास असमर्थता दर्शविली आहे. पपई उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करत ११ रुपये ५ पैसे प्रमाणे खरेदीचा निर्णय घेतल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ दरम्यान पपई हे नाशवंत पिक असल्याने हताश झालेल्या शेतकºयांनीही व्यापाºयांचा दर मान्य केला आहे़
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत सोडवण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. व्यापाºयांनी बोलावलेल्या या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, उमेश पाटील, सतीश पाटील, सत्यदेव पाटील, प्रफुल्ल पाटील, अमोल पाटील, नितीन चौधरी, अनिल पाटील यांच्यासह शेतकरी सदस्यआणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यामध्ये दराबाबत तिढा सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली़ रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती़ त्यात ११ रुपये पाच पैसे प्रतिकिलो प्रमाणे दर देण्याचे निश्चित करण्यात आले़
पपई हे नाशवंत पीक असल्याने व्यापाºयांनी त्याची खरेदी न केल्यास नुकसानीची भिती असल्याने शेतकºयांनी नाईलाजाने रात्री उशिरा ठरवण्यात आलेल्या दरांवर सहमती दर्शवली होती़ सध्या ऊन वाढत असल्याने फळ खराब होण्याची भिती असल्याने ओढाताण करणे योग्य नसल्याचे सांगत शेतकºयांनी समंजस भूमिका घेत पपई तोड सुरु करण्यास परवानगी दिली़ विशेष म्हणजे मंगळवारपासून शहादा तालुक्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी पपई तोड बंद करुन मालाची उचल करणे थांबवले होते़


गुजरात व आंध्र प्रदेशातील पपईचे उत्पादन निघायला सुरुवात झाल्याने उत्तर भारतातील बाजारपेठेत सध्या भाव घसरत असल्याचे व्यापारी सांगत आहेत़ परिणामी शेतकऱ्यांना १४ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो दराने पैसे देणे परवडणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ यावेळी बैठकीत संपूर्ण बाजारपेठेतील आॅनलाईन दर काढण्यात आले. सर्वच ठिकाणी पंधरा रुपयांहून अधिक दर असल्याचे शेतकऱ्यांनी दर्शवून दिले होते़ यानंतरही व्यापाºयांनी ऐकून घेतले नाही़ शेतकºयांनी दिलेले दरही मान्य न करता ११ रुपये ५ पैसे याप्रमाणे पपई खरेदी करण्याचे सांगून टाकले होते़ व्यापाºयांच्या या धोरणावर शेतकºयांनी बराच वेळी चर्चा केली होती़ बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी वेळावेळी चर्चा घडवून आणल्यानंतरही व्यापारी तयार होत नसल्याने अखेर त्यांच्या मागणीच्या दरांमध्ये पपई विक्री करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला़

पपई उत्पादक अणि व्यापारी यांच्यात आजवर असंख्य बैठका झाल्या परंतू एकाही व्यापाऱ्याने बाजारात दर चांगला आहे़ म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देऊ केले नाहीत़ उलट तेजी असतानाही दर कपात करण्यावर अधिक भर दिला़ व्यापाºयांकडून मनमानी पद्धतीने दर वाढवणे आणि घटवणे याची कारवाई होत असल्याचे सांगत शेतकºयांनी बैठक नाराजी व्यक्त केली़ व्यापाºयांच्या या मनमानी कारभारात यापुढे शासनाने हस्तक्षेप करुन दरांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़ शहादा तालुक्यात दरवर्षी दरांवरुन शेतकरी व्यापारी संघर्ष सुरु होतो़

Web Title: Traders hit the recession and papaya prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.