शहरवासींना धरले गेले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:27 PM2020-02-22T12:27:50+5:302020-02-22T12:28:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचार व प्रोटोकॉल पाळण्याच्या नावाखाली प्रशासनाने शहरवासीयांना वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ...

The townspeople were arrested | शहरवासींना धरले गेले वेठीस

शहरवासींना धरले गेले वेठीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचार व प्रोटोकॉल पाळण्याच्या नावाखाली प्रशासनाने शहरवासीयांना वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी दिसून आला. राज्यपालांचा वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर अर्धा तास वाहतूक रोखून धरण्यात आली. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, दवाखान्यात जाणारे रुग्ण, गावी जाणारे प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणाºया रस्त्यावरही नागरिकांना अडविण्यात आले.
प्रशासनाने राजशिष्टाचाराचा अतिरेक करून शुक्रवारी शहरवासीयांना अक्षरश: छळले. चटका देणारे ऊन, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे अर्धा तास नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.
राज्यपाल सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने नंदुरबारातील पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर दाखल झाले. तेथून ते थेट शासकीय विश्रामगृहात आले. तेथे भेटीगाठी झाल्यानंतर ते जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमासाठी दाखल झाले. तेथून टोकरतलाव रस्त्यावरील एकलव्य निवासी शाळेत व सेंट्रल किचनमध्ये गेले. सकाळी पावणेदहा ते १२ वाजेपर्यंतच्या या वेळेत त्यांचा वाहनांचा ताफा ज्या भागातून जाणार त्या भागातील रस्ते १५ ते २० मिनिटे आधी रहदारीसाठी बंद केले जात होते. विशेषत: धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी चौफुलीवरूनच वाहनांचा ताफा तीन वेळा आला व गेल्याने या मार्गावरील चारही रस्त्यांवरील वाहतूक वारंवार थांबविली जात होती.
हेलिपॅड ते विश्रामगृह या प्रवासवेळी १५ ते २० मिनिटे, विश्रामगृह ते जीटीपी कॉलेज या दरम्यान २५ मिनिटे आणि जीटीपी कॉलेज ते एकलव्य या दरम्यान प्रवासासाठी पुन्हा १५ मिनिटे अशा पद्धतीने तीन वेळा चौफुलीवरील वाहतूक थांबविण्यात येत होती. वास्तविक चौफुली ते विश्रामगृह हा रस्ता दुपदरी आहे. त्यामुळे येणाºया किंवा जाणाºया एका मार्गावरील वाहतूक सुरू ठेवणे व दुचाकी आणि तीनचाकीसह शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांना ये-जा करण्यास परवाणगी देणे आवश्यक असतांना पोलिसांनी सरसकट सर्वच वाहनांना बंदी केली. परिणामी वेळोवेळी दोन ते तीन किलोमिटर वाहनांच्या रांगा लागत होत्या.
शिवाय जे वाहनचालक अतातायीपणा करणार त्यांच्या वाहनांची नंबरप्लेटचा फोटो काढण्यात येत होता. जेणेकरून त्यांना वाहतूक नियमांचा भंग केल्याचा आॅनलाईन दंड दिला जावा. या प्रकारामुळे दोन तास शहरवासी पुरते हैराण झाले होते. गावी जाण्यासाठी बससस्थानकावर बस मिळावी यासाठी अनेक महिला, वृद्ध प्रवाशांनी पायीच जाणे पसंत केले. सार्वजनिक सुटी असतांना अनेक शाळांनी सुट्टी रद्द केल्याने शाळा देखील नेहमीप्रमाणे सुरू होत्या. परिणामी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांनाही उशीरा पोहचावे लागले. रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.

मोलगी येथेही विद्यार्थ्यांना झाला त्रास
गुरुवारी मोलगी येथे देखील राजशिष्टाचाराचा बाऊ करण्यात आला. मुख्य रस्ते अर्धा ते पाऊण तास बंद ठेवण्यात आले. यामुळे बारावीच्या परीक्षेसाठी खेड्यापाड्यातून मोलगी येथील केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहने थांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांना एक ते दीड किलोमिटर पायपीट करून परीक्षा केंद्रांवर पोहचावे लागले. वास्तविक मोलगी येथे मुख्य एकच रस्ता आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता प्रशासनाने उपलब्ध करून देत त्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवणे आवश्यक होते. परंतु सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या नावाखाली नाहक त्रास दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

पर्यायी रस्त्यांचाही झाला असता वापर...
शासकीय विश्रामगृह ते जीटीपी महाविद्यालयात जाण्यासाठी प्रशासनाने दिनदयाल चौक ते महाविद्यालय असा किंवा विश्रामगृह ते नेहरूनगर मार्गे महाविद्यालय असा रस्ता शॉर्टकट होता. असे असतांना मुख्य मार्गाने अर्थात धुळेनाका, वाघेश्वरी चौफुली, वळण रस्ता, जानता राजा चौक मार्गे जीटीपी महाविद्यालय हा फेरा असलेला रस्ता का निवडला गेला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यापैकी एक रस्ता निवडला असता तरी शहरवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागले नसते. वाहतूकही खोळंबली नसती. पर्यायी रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? याबाबत शहरवासी प्रश्न उपस्थित करीत आहेत.

Web Title: The townspeople were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.